राष्ट्र आणि धर्म यांप्रती अभिमान असणारा सोलापूर येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळी असणारा बालसाधक कु. अन्वय अभय कुलकर्णी (वय ६ वर्षे) !

कु. अन्वय कुलकर्णी

(वर्ष २०१६ मध्ये कु. अन्वयची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी होती.)

‘३१.१.२०१९ या दिवशी मी, माझी पत्नी आणि माझा मुलगा अन्वय (वय ६ वर्ष) असे तिघेजण बसलो होतो. अन्वय वर्तमानपत्रातील भारताचा राष्ट्रीय ध्वज ‘तिरंगा झेंडा’ पहात होता. त्या वेळी अन्वयमध्ये आणि माझ्यात पुढील  संभाषण झाले.

अन्वय : या तिरंगी झेंड्याऐवजी आपल्या भारत देशाचा ध्वज केशरी रंगाचा असायला पाहिजे.

मी : केशरी रंगाचा का हवा ?

अन्वय : केशरी रंग छान आहे आणि असाच ध्वज आपल्या भारत देशाचा असला पाहिजे.’

(‘क्षात्रधर्माचे प्रतीक असलेला केशरी रंग हिंदूंच्या पराक्रमाचे द्योतक आहे. स्वधर्म आणि स्वराष्ट्र यांच्यासाठी प्राणपणाने लढणारे छ. शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांच्या ध्वजाचा रंगही केशरी, म्हणजे भगवाच होता. . हिंदुत्वाचे तेज आणि ओज असलेल्या या भगव्यामध्ये हिंदूंची अस्मिता जागवण्याचे सामर्थ्य आहे. त्यामुळेच हिंदु राष्ट्राचे प्रतीक म्हणून राष्ट्रध्वज भगवा झेंडा असावा, असे या बालसाधकाला वाटते; परंतु सर्वधर्मसमभावाच्या तथाकथित कल्पेनेने भ्रमित झालेल्या निधर्मी राज्यकर्त्यांना हे कसे समजणार ?’ – संकलक) 

– अधिवक्ता अभय अनिल कुलकर्णी, पंढरपूर, जि. सोलापूर (३१.१.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF