अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी श्री शांतादुर्गादेवी आणि श्री देव रामनाथ यांच्या चरणी श्रीफळ अर्पण, तर आश्रमात श्री गणेशपूजन !

रामनाथी, गोवा २६ मे (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २७ मे ते ८ जून या कालावधीत श्री रामनाथ देवस्थान, रामनाथी, फोंडा येथे अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘हे अधिवेशन निर्विघ्नपणे पार पडावे आणि त्याचा उद्देश सफल व्हावा’, यासाठी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी २६ मे या दिवशी कवळे येथील श्री शांतादुर्गादेवी आणि रामनाथी येथील श्री देव रामनाथ यांच्या चरणी संकल्पपूर्वक श्रीफळ अर्पण केले. या वेळी त्यांच्यासमवेत साधक श्री. परशुराम प्रभुदेसाई हेही उपस्थित होते.

डावीकडून श्री रामनाथ देवाच्या चरणी श्रीफळ अर्पण केल्यावर नमस्कार करतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि श्री. परशुराम प्रभुदेसाई

सनातन आश्रमात विधीवत श्री गणेशपूजन

मयन महर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी त्यांच्या ७७ व्या जन्मोत्सव सोहळ्याच्या वेळी श्री गणेशाची उजव्या सोंडेची मूर्ती सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना प्रदान केली होती. शिवाच्या आत्मलिंगाप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टरांनी दिलेली ही गणेशमूर्तीही ‘आत्मार्थ गणेश’ आहे. अशा दिव्य मूर्तीचे या वेळी पूजन करण्यात आले. सनातन पुरोहित पाठशाळेतील पुरोहित श्री. सिद्धेश करंदीकर यांनी हे पूजन केले.

अधिवेशनाची पूर्वसिद्धता अंतिम टप्प्यात

श्री रामनाथ देवस्थानच्या प्रवेशद्वाराशी उभारलेली स्वागतकमान

अधिवेशनाची पूर्वसिद्धताही अंतिम टप्प्यात आली आहे. २७ मे या दिवशी आरंभ होणार्‍या अधिवक्ता अधिवेशनासाठी अनेक अधिवक्त्यांचे रामनाथी येथे आगमन झाले आहे. सनातनचा रामनाथी आश्रम, तसेच कार्यस्थळ श्री रामनाथ देवस्थान येथे हिंदुत्वनिष्ठांसाठी स्वागत कमानीही उभारण्यात आल्या आहेत.

अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण

जगभरातील हिंदुत्वनिष्ठांसाठी या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे थेट प्रक्षेपणही करण्यात येणार आहे.

यूट्यूब चॅनल : Hindu Janajagruti Samiti

फेसबूक पान : /HinduAdhiveshan

ट्विटर : @HinduJagrutiOrg

याचा हिंदुत्वनिष्ठांनी लाभ घ्यावा !


Multi Language |Offline reading | PDF