काँग्रेसच्या गेहलोत, कमलनाथ, पी. चिदंबरम् या नेत्यांनी पक्षापेक्षा मुलांची काळजी केली ! – राहुल गांधी यांचा उद्वेग

नेहरू, इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकार्‍यांना जो मार्ग दाखवला त्याच मार्गावरून त्यांचे नेते वाटचाल करत आहेत. त्यामुळेच नेत्यांकडूनही त्यांच्या मुलांचा विचार, घराणेशाहीचा विचार झाल्यावर गांधीघराण्याला उद्वेग का येत आहे ?

नवी देहली – सलग दुसर्‍या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवाच सामना करावा लागल्यानंतर याचे चिंतन करण्यासाठी २५ मे या दिवशी काँग्रेस कायकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभवाचे दायित्व स्वीकारत त्यागपत्र दिले होते. ‘गांधी घराण्याबाहेरील कोणाकडे तरी पक्षाची सूत्रे द्या’, असे त्यांनी बैठकीत सांगितले. या वेळी कॉँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि सरचिटणीस प्रियांका वाड्रा यांनी याचा निर्णय राहुल यांनीच घ्यावा, असे सांगितले; मात्र कार्यकारिणीने त्यागपत्र फेटाळले.

या वेळी राहुल गांधी यांनी ‘मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम् यांनी त्यांच्या मुलांना उमेदवारी देण्यासाठी आग्रह धरला; मात्र मी त्याविषयी फारसा अनुकूल नव्हतो. काही महत्त्वाच्या सूत्रांवर पक्षाच्या नेत्यांनी म्हणावे तसे गांभीर्य दाखवले नाही’, असे म्हटले.


Multi Language |Offline reading | PDF