घोर आपत्काळाला आरंभ होण्यास काही मासच (महिनेच) राहिले आहेत, हे लक्षात घ्या !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे युद्धकाळापूर्वीचे मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉ. आठवले

वर्ष २००० पासूनच ‘कालमहिम्यानुसार लवकरच आपत्काळ येणार’, याची साधकांना जाणीव आहे; परंतु आता आपत्काळ दारात येऊन ठेपला आहे. घोर आपत्काळाला आरंभ होण्यास केवळ काही मासच राहिले आहेत. वर्ष २०१९ नंतर तिसर्‍या महायुद्धाला आरंभ होणार असल्याचे नाडीभविष्य सांगणारे आणि द्रष्टे साधू-संत यांनी सांगितले आहे. प्रथम ते महायुद्ध मानसिक स्तरावर असेल. कोणत्याही दोन राष्ट्रांमधील महायुद्ध हे आधी मानसिक स्तरावर असते, उदा. कोरिया-अमेरिका संघर्ष, चीन-अमेरिका संघर्ष. पुढे २ – ३ वर्षांनी ते भौतिक स्तरावर असेल. ‘सुक्याबरोबर ओलेही जळते’, या सिद्धांतानुसार सज्जन, साधक आदींनाही आपत्काळाची झळ बसणार आहे. आपत्काळात वादळ, भूकंप आदींमुळे वीजपुरवठा बंद पडतो. पेट्रोल, डिझेल यांचा तुटवडा निर्माण होऊन वाहतूक व्यवस्था कोलमडते. त्यामुळे गॅस, खाण्या-पिण्याच्या वस्तू आदी अनेक मास (महिने) मिळत नाहीत वा मिळाल्या तरी त्यांचे ‘रेशनिंग’ होते. आपत्काळात डॉक्टर, वैद्य, औषधे, रुग्णालये उपलब्ध होणे अशक्यच असते. आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, आध्यात्मिक स्तरांवर पूर्वसिद्धता करणे आवश्यक आहे.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now