रामनाथी, गोवा येथे उद्यापासून ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला प्रारंभ

अधिवेशनात सर्व कार्यक्रमांना मिळून भारतातील २६ राज्ये आणि बांगलादेश येथून एकूण २०० हून अधिक हिंदु संघटनांचे ८०० पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित रहाणार 

रामनाथी (गोवा), २५ मे (वार्ता.) – हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी आणि कृतीची पुढील दिशा ठरवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २७ जूनपासून श्री रामनाथ देवस्थान, फोंडा, गोवा येथे ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला प्रारंभ होणार आहे. २७ मे ते ८ जून या कालावधीत होणार्‍या या अधिवेशनाला भारतातील २६ राज्ये आणि बांगलादेश येथून एकूण २०० हून अधिक हिंदु संघटनांचे ८०० पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत.

१२ दिवस चालणार्‍या या अधिवेशनाच्या अंतर्गत २७ आणि २८ मे या दिवशी धर्मप्रेमी अधिवक्त्यांचे ‘धर्मप्रेमी अधिवक्ता अधिवेशन’, २८ मे या दिवशी एक दिवसीय ‘उद्योगपती अधिवेशन’, २९ मे ते ४ जून या कालावधीत मुख्य ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’, तसेच हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना हिंदु राष्ट्राचे कार्य करण्यासाठी प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने ५ ते ८ जून या कालावधीत ‘हिंदु राष्ट्र-संघटक प्रशिक्षण आणि अधिवेशन’ यांचे आयोजन करण्यात आले आहे.

‘सोशल मीडिया कॉन्क्लेव्ह’चे (सामाजिक माध्यमांतून धर्मप्रेमींच्या बैठकीचे) आयोजन

‘सोशल मीडिया’ (सामाजिक माध्यम) या क्षेत्रातील धर्मनिष्ठ हिंदु कार्यकर्ते आणि विचारवंत यांच्यासाठी २ जून या दिवशी पहिल्या एक दिवसीय ‘सोशल मीडिया कॉन्क्लेव्ह’चे (सामाजिक माध्यमांतील धर्मप्रेमींच्या बैठकीचे) आयोजनही करण्यात आले आहे. ही ‘कॉन्क्लेव्ह’ अधिवेशनाच्या मुख्य स्थळी असणार आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now