आतंकवादी झाकीर मुसा याच्या अंत्ययात्रेला सहस्रो देशद्रोही धर्मांधांची गर्दी

काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांना ठार केल्यावर त्यांचा मृतदेह कुटुंबियांना देण्यात येतो. प्रत्येक वेळी सहस्रो देशद्रोही धर्मांधांकडून त्यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी भारतविरोधी घोषणा देण्यासह आतंकवाद्यांचे समर्थन आणि उदात्तीकरण केले जाते. हे लक्षात घेऊन भाजप सरकारने आता आतंकवाद्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्याचे बंद करून अज्ञात ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा कायदा करणे आवश्यक !

नुरपुरा (जम्मू-काश्मीर) – पुलवामा येथे ठार करण्यात आलेला आणि अल्-कायदा आतंकवादी संघटनेशी संबंधित असलेल्या ‘अन्सार गझवट उल हिंद’ या संघटनेचा प्रमुख झाकीर मुसा याच्या अंत्ययात्रेत सहस्रोच्या संख्येने देशद्रोही धर्मांध गोळा झाले होते. या वेळी त्यांनी मुसाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत काही ठिकाणी दगडफेक केली. तत्पूर्वी मुसाला ठार करण्यात आल्यावर २४ मे या दिवशी शोपियां, पुलवामा, अवंतीपोरा आणि श्रीनगर या भागात मोठ्या प्रमाणात निषेधमोर्चे काढण्यात आले. तसेच मुसा याच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now