बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या

बंगालची काश्मीरच्या दिशेने वाटचाल !

  • बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या राज्यात केवळ सामान्य जनांची नव्हे, तर राष्ट्रीय सुरक्षाही धोक्यात आली आहे. असे असतांना तेथील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नवनिर्वाचित भाजप सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे !
  • केरळ, तमिळनाडू, कर्नाटक या राज्यांपाठोपाठ आता बंगालमध्येही भाजपच्या कार्यकर्त्यांच्या होत असलेल्या हत्या रोखण्यासाठी नवनिर्वाचित भाजप सरकार प्रयत्न करणार का ?

कोलकाता – बंगालच्या नादिया जिल्ह्यात अज्ञातांनी भाजपच्या २५ वर्षीय संतुराम घोष या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना २४ मेच्या रात्री घडली.  संतुराम घोष यांनी काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने संतुराम घोष यांच्या हत्येसाठी तृणमूल काँग्रेसला उत्तरदायी ठरवले आहे. फेब्रुवारी मासातही या जिल्ह्यात भाजपच्या एका कार्यकर्त्याची हत्या झाली होती. दुसरीकडे निवडणुकीच्या निकालानंतर बैरकपूर येथे हिंसाचार झाला. तेथे झालेल्या एका स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. येथे भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला आहे.

तृणमूलला त्याच्या भाषेतच उत्तर देऊ ! – भाजप प्रदेशाध्यक्ष

अशा धमक्या देऊन दुप्पट हिंसाचार करण्यापेक्षा बंगालमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष केंद्रातील स्वतःच्या सरकारच्या माध्यमातून बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न का करत नाही ?

तृणमूल काँग्रेसचे गुंड सातत्याने विरोधी पक्षांच्या नेत्यांवर आणि उमेदवारांवर आक्रमण करत आहेत. ममता बॅनर्जी त्यांच्या पक्षाचा पराभव स्वीकारू शकलेल्या नाहीत. जर तृणमूल काँग्रेस हिंसा करून धमकावण्याचा प्रयत्न करत असेल आणि आमच्यावर आक्रमण करत असेल, तर आम्ही त्याला तशाच पद्धतीने उत्तर देऊ, अशी चेतावणी  बंगालचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी दिली आहे.


Multi Language |Offline reading | PDF