आपत्काळात गुणकारी बिंदूदाबन उपचारपद्धत !

रोगमुक्त करणारी बिंदूदाबन उपचारपद्धत !

उपयुक्तता आणि लाभ

या पद्धतीने प्रत्येकाला स्वतःचे स्वतःच आणि घरातल्या घरात उपाय करता येतात. हे उपाय आवश्यकतेप्रमाणे दिवसातून एकदा किंवा जास्त वेळाही करून घेता येतात. या पद्धतीने रोगांची बाह्य लक्षणे अल्प करता येतात आणि पुनःपुन्हा उद्भवणार्‍या एखाद्या रोगाची परिस्थिती आटोक्यात आणता येते. अन्य एखाद्या प्रकारच्या उपायाच्या पद्धतीला साहाय्यक होऊन प्रकृतीत वेगाने सुधारणा घडवून आणणे शक्य होते. या पद्धतीने शरिराचे अवयव अन् तंत्रव्यवस्था यांची कार्यक्षमता वाढवता येते. अ‍ॅलोपॅथीच्या औषधांच्या सेवनाने होणार्‍या दुष्परिणामांप्रमाणे या उपायांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. या उपायपद्धतीने प्रत्यक्षात जाणवणार्‍या लाभापेक्षा कितीतरी जास्त लाभ होतो. आधुनिक वैद्य येईपर्यंत किंवा रुग्णालयात भरती करेपर्यंत रुग्णाला होणार्‍या त्रासाची तीव्रता अल्प करता येते. हृदयविकाराचा किंवा दम्याचा झटका येणे, यांसारख्या शरिराच्या एखाद्या नाजूक अवस्थेत धोका टाळण्यासाठी पुढील वैद्यकीय साहाय्य मिळेपर्यंत प्राथमिक उपाय करून रुग्णाला साहाय्य करता येते.

या उपायपद्धतीवर असलेला दृढ विश्‍वास, स्वतःचे प्रयत्न आणि दृढ मनोबळ यांमुळे रोगमुक्त रहाता येते.

लाभ होण्यातील टप्पे

१. शारीरिक विकृती संपली, तर विकार नष्ट होतील.

२. मानसिक विकार नष्ट झाले, तर मानसिक आरोग्य चांगले राहील.

३. मानसिक आरोग्यातून चांगल्या विचारधारांचा जन्म होईल. त्यातूनच हिंदु राष्ट्राची मुहूर्तमेढ रोवली जाईल.

४. हिंदु राष्ट्राच्या मुहूर्तमेढीतूनच ईश्‍वरी राज्याची पहाट उगवेल.

५. चांगल्या विचारधारा वैश्‍विक शांतीच्या दृष्टीने वैचारिक क्रांती घडवून आणतील.

चेतना (प्राण) शक्ती घटणे किंवा थकवा येणे

१. उजव्या हाताचे कोपर आणि मनगट यांच्या मधोमध १ इंच व्यासाच्या वर्तुळात असलेल्या बिंदूवर २ मिनिटे थांबून दाब द्यावा.

२. करंगळीच्या दुसर्‍या पेरावर आणि पायाच्या करंगळीच्या मुळाशी २-३ मिनिटे दाब द्यावा.

३. कंगव्याचे दात बोटांच्या बाजूला येतील आणि त्या दातांचा दाब बोटांवर येईल, अशा पद्धतीने मूठ बंद करावी. दात बोटांच्या विरुद्ध दिशेला येतील आणि त्यांचा दाब तळहातावर पडेल, अशा पद्धतीने कंगवा धरून मूठ बंद करावी.

बिंदूदाबन : काळाची आवश्यकता !

कलियुगातील रज-तमात्मक प्रभावाचा लय हा ठरलेला असल्याने आपत्काळ येणारच आहे. हा आपत्काळ जितका भयावह, तितकाच दु:खदायीही आहे. अनेक द्रष्ट्या संतांनी सांगितल्याप्रमाणे विश्‍वावर ज्या वेळी भीषण संकटे येण्यास आरंभ होईल, त्या वेळी येणार्‍या प्रत्येक शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आपत्तीशी स्वयंपूर्ण रितीने लढणेच आवश्यक आहे; कारण या काळात महाभयंकर विनाशाला आरंभ होणार असल्याने कोणत्याच गोष्टीचे सुबत्तादर्शक प्राबल्य सर्वसामान्य जिवांना मिळणार नाही. अशा वेळी आपत्काळात बिंदूदाबन ही पद्धत अत्यंत गुणकारी आणि अतिशय आवश्यक बनणार आहे. बिंदूदाबनाचा वापर ही येणार्‍या काळाची आवश्यकता आहे. ती जाणून प्रत्येकानेच स्वयंपूर्ण बनवणार्‍या या उपचारपद्धतीचा अभ्यास आणि वापर केला पाहिजे.

‘बिंदूदाबन उपाय’ म्हणजे काय ?

शरिरातील विशिष्ट बिंदूंद्वारे आंतरिक अवयव कार्यान्वित करण्यासाठी बिंदूदाबन (अ‍ॅक्युप्रेशर), बिंदूछेदन (अ‍ॅक्युपंक्चर), झोन थेरपी, रिफ्लेक्सॉलॉजी या उपचारपद्धती सध्या अस्तित्वात आहेत; मात्र बिंदूदाबन ही सर्वांत जुनी आणि सोपी उपचारपद्धत आहे. शरिरावरील विशिष्ट बिंदूंवर दाब देऊन आंतरिक अवयव कार्यान्वित करणे आणि त्याद्वारे व्यक्तीचे स्वास्थ्य सुधारणे, तसेच देहातील त्या त्या भागाशी संलग्न शक्तीबिंदूंवर दाब देणे, म्हणजे ‘बिंदूदाबन उपाय’.

हे बिंदू शिवरूपी लयशक्तीचे प्रतीक असल्याने देहातील त्या त्या अवयवाशी संबंधित एकत्रित ऊर्जारूपी चेतनेचे घनीकरण झालेल्या बिंदूरूपी ठिकाणाला आवश्यक त्या प्रमाणात दाबन देऊन व्याधीवर मात करणे, म्हणजेच बिंदूदाबन !

बिंदूदाबनाचे उपाय म्हणजे हातांचा वापर करून सगुण-निर्गुण स्तरावरील पंचतत्त्वांचा आधार घेणे.


Multi Language |Offline reading | PDF