(म्हणे) ‘ध्रुवीकरण आणि विभाजनवादी धोरण यांमुळे मोदी यांचा विजय !’

‘टाइम’ नियतकालिकाकडून पुन्हा पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका

हिंदूंनी बहुमतांनी एका हिंदु राष्ट्रवादी नेत्याला निवडून दिल्यावर विदेशी नियतकालिकांचा जळफळाट होणे अपेक्षितच आहे ! ‘आता मोदी यांनी हिंदुत्वाचे कार्य प्रखरतेने करून अशा टीकांना चोख उत्तर दिले पाहिजे’, असेच त्यांना निवडून दिलेल्या हिंदूंना वाटते !

नवी देहली – अमेरिकेतील ‘टाइम’ या प्रसिद्ध नियतकालिकाने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारा लेख प्रकाशित केला आहे. या वेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयावर टीका केली आहे. यात ‘ध्रुवीकरण आणि विभाजनवादी धोरण ही मोदी यांच्या विजयाची मूळ कारणे आहेत’, असे म्हटले आहे. या लेखासह एक आक्षेपार्ह चित्रही प्रसिद्ध करण्यात आले आहे. यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदी भारताचे दोन तुकडे करत आहेत, असे दाखवण्यात आले आहे. (राहुल गांधी यांना हे चित्र मान्य आहे का ? – संपादक) यापूर्वी या नियतकालिकाने प्रसिद्ध केलेल्या लेखात मोदी यांना ‘दुफळी निर्माण करणारा भारतातील प्रमुख नेता’ असे म्हटले होते. (इतर देश स्वतःच्या एकाधिकारात रहावेत, यासाठी अमेरिकेने गेल्या ७ दशकांत जी काही षड्यंत्रे रचली, ती दुफळी माजवण्यापेक्षाही भयंकर होती. याविषयी ‘टाइम’ काही लिहिण्याचे धाडस करणार का ? – संपादक) हा लेख पाकिस्तानी पत्रकार आतिश तसीर यांनी लिहिला होता. (पाकिस्तानी पत्रकाराकडून याहून वेगळे लिखाण काय होणार ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF