परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या पुस्तिकेतील चैतन्यामुळे नकारात्मक विचारांत पालट होणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

‘जन्मोत्सव विशेषांक आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन भाग – ३’ हा ग्रंथ यांच्यासाठी विज्ञापन घेण्याकरता पूर्वी साधनेत असलेल्या साधिकेच्या घरी गेलो होतो. तिच्याशी साधनेसंदर्भात चर्चा केल्यावर साधकांनी तिच्याकडे विज्ञापनाचा विषय काढला. त्या वेळी ‘नामस्मरणाने काय होणार आहे ? पूर्वी साधना करून मला काही लाभ झाला नाही’, असे नकारात्मक बोलून ती आतल्या खोलीत झोपण्यासाठी गेली. ती पुन्हा बाहेर आल्यावर तिच्या हातात गुरुदेवांची ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन भाग – १’ ही पुस्तिका दिली आणि त्यातील प्रत्येक पान बघावयास सुचवले. पाच मिनिटांनंतर ती आणि तिचा मुलगा म्हणाले, ‘‘एकवीस सहस्रांची जाहिरात घ्या. १५ दिवसांनी पैसे देतो.’’ त्या वेळी आमच्या लक्षात आले, ‘त्या पुस्तिकेतील प्रचंड चैतन्यामुळे तिचे मन आणि बुद्धी यांवरचे आवरण दूर झाले आणि तिने सकारात्मक होऊन विज्ञापन दिले.’ – आधुनिक वैद्य रविकांत नारकर, पडेल, सिंधुदुर्ग (३०.४.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF