फ्रान्सच्या ल्योन शहरात झालेल्या बॉम्बस्फोटात १३ जण घायाळ

आतंकवादाच्या सावटाखाली फ्रान्स !

पॅरिस (फ्रान्स) – ल्योन शहरामध्ये रस्त्याच्या कडेला झालेल्या एका बॉम्बस्फोटामध्ये १३ जण घायाळ झाले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार बॉम्बस्फोट होण्याच्या ३० मिनिटे आधी घटनास्थळी एका व्यक्तीला पहाण्यात आले होते. त्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांना मिळाले आहे. त्या व्यक्तीकडे सायकल होती. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. फ्रान्समध्ये यापूर्वी आतंकवादी आक्रमणे झाली आहेत. इतर युरोपीय देशांपेक्षा सर्वाधिक मुसलमान फ्रान्समध्ये रहातात.


Multi Language |Offline reading | PDF