आपत्काळाचे भीषण स्वरूप

सध्या संपूर्ण विश्वात, तसेच भारतातही आपत्काळाने महाभयंकर रूप धारण केले आहे. अनेक द्रष्ट्या संतांनीही ‘भावी काळ हा केवळ भारतासाठीच नाही, तर संपूर्ण विश्वासाठी भीषण आहे’, असे सांगितले आहे. ‘पृथ्वीवर सुनामी, भूकंप इत्यादी अनेक भयानक नैसर्गिक आपत्ती येणार आहेत. त्यामुळे पृथ्वीही सोडायची वेळ येईल’, असे शास्त्रज्ञही सांगत आहेत. या आपत्काळाचा अनुभव संपूर्ण मानवजातीला दिवसेंदिवस विविध माध्यमांतून येतच आहे. यातूनच त्याच्या भीषणतेची कल्पना करता येईल.

तीव्र पाणीटंचाई

‘येत्या १५ वर्षांत पृथ्वीवरच्या दोन तृतीयांश परिसराला पाणीटंचाई जाणवू लागेल. भारतात ९ वर्षांत ती तीव्र होईल’, असे भाकीत अमेरिकेचे परराष्ट्र उपमंत्री रॉबर्ट ब्लेक यांनी वर्ष २०११ मध्ये केले होते. प्रत्यक्षातही सध्या तसे होत आहे. काही राज्यांमध्ये आटलेल्या विहिरींमधून पाणी मिळवले जाते. काही ठिकाणी ८ ते १५ दिवसांआड पाणीपुरवठा होतो. पूर्वी १०० वर्षांनी घडणारी हवामानाची तीव्र आपत्ती आता २० वर्षांतच घडत आहे.

केरळमधील भयावह जलप्रलय !

ऑगस्ट २०१८ मध्ये केरळ राज्यात अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे पूर्ण राज्यात पूर आला होता. अनेकांचा जीव घेणारा आणि सहस्रो कोटी रुपयांच्या हानीस कारणीभूत ठरणारा हा पूर केरळ राज्याने ९० वर्षांनंतर अनुभवला. या महापुराने ३७० हून अधिक लोकांचा जीव घेतला असून एकंदर ६.५ लाखांपेक्षा अधिक लोकांना ३ सहस्र ४४६ निर्वासित शिबिरांमध्ये स्थलांतरित केले. केरळमधील १४ जिल्ह्यांमध्ये काही दिवस ‘रेड अलर्ट’ होता. राज्याला २० सहस्र कोटींचे नुकसान झाले असल्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांनी केंद्र सरकारला कळवले. राज्यातील २११ पेक्षा अधिक क्षेत्रांमध्ये भूस्खलन झाले. २० सहस्रांपेक्षा अधिक घरे आणि एकंदर ५० सहस्र किमी एवढे रस्ते नष्ट झाले. २१० पेक्षा अधिक पूल भुईसपाट झाले. अनेक शाळा, आरोग्य केंद्रे, पंचायत इमारती इत्यादीही नष्ट झाल्या. राज्याला पूर्वस्थितीत यायला अनेक मास लागले. अशा स्थितीला केव्हाही सामोरे जावे लागू शकते. काही वर्षांपूर्वी उत्तराखंडमध्येही असाच जलप्रलय आला होता.

दुष्काळ आणि महापूर

‘यांत्रिकीकरण आणि पर्यावरणाचा ह्रास यांमुळे भविष्यात नैसर्गिक संकटे वाढणार असून जगातील ७५ टक्के लोकांना दुष्काळ, महापूर यांचा फटका बसेल. ‘पर्यावरण चक्र विस्कळीत झाल्याने त्याचे भयंकर परिणाम मानवाला येत्या काळात भोगावे लागतील’, अशी माहिती ‘ख्रिश्चन एड’ या पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्या संस्थेने दिली आहे.

भूकंप, ज्वालामुखी अन् सुनामी

पर्यावरणाचा ह्रास होत असल्याने समुद्राच्या तळाशी तीव्र भूकंप किंवा ज्वालामुखीचा उद्रेक, सुनामी होण्याच्या घटना आजवर अनेक ठिकाणी घडल्या आहेत. यात समुद्री लाटांचा पुढे सरकण्याचा वेग घंट्याला ८०० ते १ सहस्र किलोमीटर असतो. वर्ष २००४ मध्ये तमिळनाडू येथे आलेल्या सुनामीने केलेला संहार आपण सर्वांनीच अनुभवला आहे.

महिलांवरील अत्याचार

महिलांवरील अत्याचारांनी भारतात परिसीमाच गाठली आहे. ‘भारतातील महिला खऱ्या अर्थाने सुरक्षित आहे’, असे म्हणणे चुकीचे ठरेल; कारण आज अनेक वासनांधांच्या वखवखलेल्या नजरा कोणत्याही वयोगटातील स्त्रीवर मग ती अगदी तान्हुली असो, विद्यार्थिनी, युवती असो किंवा विवाहित आणि वयोवृद्ध महिलाही असो त्यांच्यावर खिळलेल्या असतात. यामुळेच विनयभंग, बलात्कार, अत्याचार यांनी उच्चांक गाठलेला आहे. महिलांवरील वाढते अत्याचार ही भीषण आपत्काळाची नांदीच आहे.

जिहादी आतंकवाद

जागतिक स्तरावर सध्या भेडसावणारे आणि भारतासाठी १९८० पासून डोकेदुखी ठरलेले आतंकवादाचे संकट भयावह झाले आहे. आतापर्यंत देशात झालेली आतंकवादी आक्रमणे पहाता शत्रूराष्ट्रे भारताला गिळंकृत करू पहात आहेत. पाक आणि चीन यांच्याकडून वारंवार केली जाणारी घुसखोरी आपल्याला नवीन नसली, तरी ती तितकीच गंभीर आहे. आपण सतर्क न झाल्यास प्रत्येक वेळी घुसखोरी करणाऱ्यांना भारतात वास्तव्य करण्यास कितीसा वेळ लागणार आहे ?

आतापर्यंत आतंकवादामुळे भारतातील ६ लाख कुटुंबे विस्थापित झाली आहेत. ४५ सहस्र कोटी रुपयांची हानी झाली आहे. सुरक्षादलाचे सैनिक आणि पोलीस असे एकूण सहस्राहून अधिक जण प्राणाला मुकले आहेत.

काश्मीरमध्ये सहस्रो हिंदु स्त्रियांवर बलात्कार आणि ३ सहस्रांहून अधिक हिंदूंच्या हत्या केल्या गेल्या आहेत. आतंकवादामुळे ४ लक्ष काश्मिरी हिंदू त्यांच्या मातृभूमीतून विस्थापित झाले आहेत. अनेक आतंकवादी संघटना देशात जिहाद घडवण्याच्या सिद्धतेत आहेत. सध्याच्या काळात ‘आतंकवाद’ ही समस्या देशातील सर्वांत मोठी समस्या ठरली आहे, असेच म्हणावे लागेल !


Multi Language |Offline reading | PDF