अधर्मी अधिवक्ता आणि धर्मप्रेमी अधिवक्ता

२७ आणि २८ मे या दिवशी रामनाथी (गोवा) येथे होणार्‍या अधिवक्ता अधिवेशनाच्या निमित्ताने…

(सौ.) योया वाले

खर्‍याचे खोटे आणि खोट्याचे खरे करणारे अनेक अधिवक्ते समाजात आढळतात. अशा अधिवक्त्यांना व्यक्तीगत स्तरावर कोणती हानी सोसावी लागू शकते, त्यांचा समाजावर कोणता परिणाम होतो, आदी सूत्रे येथे प्रसिद्ध करत आहोत. त्यासह सत्यनिष्ठ, धर्मप्रेमी आणि नीतीवान अधिवक्ते असल्यास त्यांच्यामुळे कसे सकारात्मक परिणाम होतात, तेही येथे दिसून येईल.

‘सौ. योया वाले युरोपातील असूनही त्यांना ‘भारतातील अधिवक्त्यांची स्थिती काय आहे’, हे ज्ञात आहे. त्यावरून त्यांची सूक्ष्मातील जाणण्याची अफाट क्षमता लक्षात येते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. अधर्मी अधिवक्ता आणि धर्मप्रेमी अधिवक्ता यांच्यातील भेद

२. अधर्मी अधिवक्ता आणि धर्मप्रेमी अधिवक्ता यांचे समाजावर होणारे परिणाम

१. अधर्मी अधिवक्ता

अ. कायद्यातील सर्व नियमांचे पालन न करता असत्याच्या बाजूने असल्याने समाजातील त्रासदायक शक्तीचे प्रमाण वाढत असणे आणि त्यामुळे याचा समाजावर विपरीत परिणाम होणे

आ. त्रासदायक शक्तीचे कण वातावरणात सभोवताली प्रवाहित होणे

इ. समाज आणि अधिवक्ते यांच्याभोवती काळ्या शक्तीचे आवरण निर्माण होऊन ते निरुत्साही बनणे

ई. मायावी शक्ती कार्यरत झाल्यामुळे समाजातील लोक भ्रष्ट अन् असत्याच्या बाजूने लढणार्‍या अधिवक्त्यांकडे आकर्षित होणे

उ. हे पापाचे भागीदार होऊन मृत्यूनंतर तिसर्‍या पाताळापर्यंत जाण्याची शक्यता असणे

२. धर्मप्रेमी अधिवक्ता

अ. कायद्यातील सर्व नियमांचे पालन करून सत्याच्या बाजूने असणे

आ. धर्मानुसार आचरण असल्याने देवतांचे आशीर्वाद असणे

इ. सभोवतालच्या वातावरणात चैतन्याचे प्रमाण वाढणे

ई. धर्मासाठी लढण्यासाठी शक्ती प्रवाहित होणे आणि ती अधिवक्त्यांना मिळणे

उ. अधिवक्ते आणि समाजातील लोक या दोघांनाही शांती आणि समाधान मिळणे

३. अधिवक्त्यांचे वस्त्र

अ. अधिवक्त्यांनी परिधान केलेल्या काळ्या रंगाच्या कपड्यांतून येत असलेली त्रासदायक शक्ती अधिवक्त्यांच्या भोवती पसरल्यामुळे त्यांना निरुत्साही वाटण्याची शक्यता असते.

आ. अल्प प्रमाणात त्रासदायक शक्ती असणारे आणि अधिक उत्साह वाढवणारे पांढर्‍या रंगाचे कपडेच परिधान करणे अधिवक्त्यांसाठी श्रेयस्कर असते.

४. सध्याच्या काळातील धर्मप्रेमी अधिवक्त्यांच्या संघटनाचे महत्त्व

आपत्काळाच्या पूर्वी आणि त्या कालावधीत धर्माचरण करणार्‍या अधिवक्त्यांचे संघटन करून त्यांच्या माध्यमातून सध्याच्या अधर्मी न्यायप्रणालीतील त्रुटी आणि अपप्रवृत्ती समजून घेणे, तसेच त्या दूर करण्यासाठी आवश्यक ते पालट करून धर्माधिष्ठित न्यायप्रणालीची स्थापना करणे आवश्यक आहे. त्यामुळे पुढे येणार्‍या हिंदु राष्ट्राची सात्त्विक पिढी त्या कायद्यांचे पालन करून सत्याने आणि धर्माचरणाने वागेल. अशा प्रकारे हिंदु राष्ट्रात धर्माधिष्ठित न्यायप्रणालीची घडी बसलेली असून सर्वत्र न्यायदानाची प्रक्रिया आध्यात्मिक स्तरावर होईल.’

–  सौ. योया वाले, युरोप, एस्.एस्.आर्.एफ्.


Multi Language |Offline reading | PDF