संतांचे आज्ञापालन करण्याचा प्रयत्न केल्यावर देवाने साहाय्य केल्याची साधकाला आलेली अनुभूती !

डॉ. नन्द किशोर

१. वाराणसी सेवाकेंद्रामध्ये होणार्‍या शिबिराच्या सेवेसाठी जायचे असणे आणि शारीरिक त्रास वाढल्याने सेवेसाठी येण्याविषयी पू. नीलेश सिंगबाळ यांना विचारल्यावर त्यांनी होकार देणे

‘माझे वडील डॉ. नंदकिशोर वेद यांंना वाराणसी सेवाकेंद्रामध्ये होणार्‍या शिबिराच्या सेवेसाठी बोलावले होते. तेथे जाण्यासाठी त्यांनी आगगाडीचे आरक्षण केले होते; परंतु ते आरक्षण निश्‍चित (कन्फर्म) झाले नव्हते. त्या कालावधीत त्यांचा शारीरिक त्रास वाढल्यामुळे वाराणसी सेवाकेंद्रात सेवेसाठी येण्याविषयी त्यांनी पू. नीलेशदादांना (पू. नीलेश सिंगबाळ यांना) दूरभाष करून विचारले. पू. नीलेशदादांनी बाबांना सेवाकेंद्रात येण्यास सांगितले.

२. एका हिंदुत्वनिष्ठांनी घरी येऊन ‘तुमच्या समवेत वाराणसीला येईन’, असे सांगणे आणि त्याप्रमाणे त्यांच्या समवेत वाराणसीला जाणे

त्यांंना उभे रहातांनाही त्रास होत होता. त्यांना स्वतःची बॅग उचलणेही शक्य नव्हते, तरीही त्यांच्या मनात सेवाकेंद्रात जाण्याचा विचार चालू होता. सकाळी अकस्मात एक हिंदुत्वनिष्ठ घरी आले आणि बाबांना म्हणाले, ‘‘मलाही वाराणसीला बोलावले आहे. मी तुमच्या समवेत येईन आणि तुमची बॅग उचलीन.’’ बाबा सेवाकेंद्रात जाण्यास निघण्याआधी आम्ही सर्वांनी त्यांच्या समवेत सामूहिक प्रार्थना केली. त्यानंतर ते दुसर्‍या स्थानिक (लोकल) आगगाडीने वाराणसी सेवाकेंद्रात सेवेसाठी गेले.

३. वरील प्रसंगातून आज्ञापालनाचे महत्त्व लक्षात येणे

बाबा आगगाडीतून लांबचा प्रवास करू शकत नाहीत. पू. नीलेशदादांनी सांगितलेल्या ‘तुम्ही या. तुम्हाला होत असलेला त्रास आध्यात्मिक असेल, तर इकडे आल्यावर तो न्यून होईल’, या वाक्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून स्वतःच्या शारीरिक त्रासाकडे लक्ष न देता ते वाराणसी सेवाकेंद्रात सेवेसाठी गेले. यातून ‘पूर्ण श्रद्धेने आणि शरणागतभावाने प्रार्थना केल्याने ईश्‍वर कोणत्या ना कोणत्या माध्यमातून साहाय्य करतो’, हे मला शिकायला मिळाले.’

– सौ क्षिप्रा जुवेकर, जळगाव (३.७.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF