भाजपचा एकूण ३०३ जागांवर विजय

नवी देहली – १७ व्या लोकसभेच्या ५४२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल पूर्णपणे लागला आहे. यात भाजपला ३०३ जागा मिळाल्या आहेत, तर काँग्रेसला केवळ ५२ जागा मिळाल्या आहेत. वर्ष २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या. त्या तुलनेत त्याच्या ८ जागा वाढल्या आहेत. द्रमुक २३, तृणमूल काँग्रेस २२, वायएस्आर् २१ आणि शिवसेना १८ जागांवर विजयी झाली आहे.


Multi Language |Offline reading | PDF