मोदी यांना विजयाच्या शुभेच्छा देतांनाच पाककडून अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची चाचणी

‘एअर स्ट्राईक’ आणि ‘सर्जिकल स्ट्राईक’ यांचा पाकवर विशेष काही परिणाम झालेला नाही, हे यातून दिसून येते. याउलट तो भारताची अधिकाधिक हानी करण्याची सिद्धता करत आहे, हे लक्षात घेऊन त्याच्यावर धडक कारवाई करणे आवश्यक !

पाकद्वारा बॅलेस्टिक क्षेपणास्त्र ‘शाहीन-४’ची यशस्वी चाचणी

इस्लामाबाद – भारतात २३ मे या दिवशी मतमोजणीच्या वेळी भाजपला बहुमत मिळत असतांना दुसरीकडे मात्र पाकने क्षेपणास्त्र चाचणी करून भारताला संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय संपादन केल्याच्या प्रीत्यर्थ त्यांचे अभिनंदन करून शांतता चर्चा चालू करण्याची इच्छा व्यक्त केली. (तोंडात शांततेच्या वार्ता आणि पाठीमागे क्षेपणास्त्राची चाचणी करणार्‍या पाकवर भाजप सरकार आता विश्‍वास ठेवणार नाही, अशीच अपेक्षा ! – संपादक)

२३ मे या दिवशी पाकने बॅलेस्टिक क्षेपणास्त्र ‘शाहीन-४’ची यशस्वी चाचणी केली. हे क्षेपणास्त्र दीड सहस्र किमीपर्यंत मारा करू शकते. याच्या टप्प्यामध्ये भारताची काही महत्त्वाची शहरे आली आहेत. हे क्षेपणास्त्र अणूबॉम्बही टाकू शकते.

१. भारताच्या संरक्षणतज्ञांच्या मते भारतात पुन्हा मोदी निवडून आले आहेत. पुढे भारताने पाकच्या विरोधात एखादी आगळीक केली, तर पाक त्याला जशासतसे उत्तर देऊन भारताची हानी करू शकतो, असे दाखवण्याचा प्रयत्न पाकने यातून केला आहे.

२. भारतानेही २२ मे या दिवशी सुखोई-३० या लढाऊ विमानाद्वारे ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी केली होती.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now