३० मे या दिवशी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता

नवी देहली – भाजपला विजय मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन त्यागपत्र सादर केले आहे. त्यानंतर राष्ट्रपती यांनी त्यांना नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ३० मे या दिवशी मोदी पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी ते २८ मे या दिवशी वाराणसी, तर २९ मे या दिवशी त्यांच्या गुजरात येथील घरी जाऊन आईची भेट घेणार आहेत.


Multi Language |Offline reading | PDF