विकलांग असूनही आंतरिक साधना चालू असलेले सांगली येथील संकेत कुलकर्णी संतपदी विराजमान !

सनातनच्या संतांच्या मांदियाळीत गुरुकृपेने लाभले ९६ वे संतरत्न !

पू. संकेत कुलकर्णी

मिरज, २४ मे (वार्ता.) – विकलांग असूनही आंतरिक साधना चालू असलेले, तसेच परेच्छेने वागणे, सहनशीलता यांसह अनेक दिव्य गुण असलेले विश्रामबाग, सांगली येथील श्री. संकेत कुलकर्णी (वय ३० वर्षे) २४ मे या दिवशी ७१ टक्के आध्यात्मिक स्तर गाठून ९६ व्या संतपदी विराजमान झाले. ब्राह्मणपुरी, मिरज येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या एका हृदयस्पर्शी भावसोहळ्यात सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी हे गोड गुपित उलगडले.

या सोहळ्यासाठी सांगली येथील पू. सदाशिव परांजपे आणि पू. (सौ.) शैलजा परांजपे यांची वंदनीय उपस्थिती होती. पू. सदाशिव परांजपे यांच्या हस्ते परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची प्रतिमा, तसेच भेटवस्तू देऊन श्री. संकेत कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यासाठी पू. संकेत कुलकर्णी यांचे वडील श्री. गुरुदास कुलकर्णी आणि आई सौ. सुजाता कुलकर्णी यांच्यासह अन्य साधक उपस्थित होते.

सविस्तर वृत्त लवकरच . . . 

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now