सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या फलकांची भीती वाटणारे पोलीस !

‘सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने भाविकांचे हार्दिक स्वागत’ असे लिखाण असलेल्या फलकांमुळे सुरक्षायंत्रणेला बाधा येत होती कि आणखी काय अडचण येत होती, हे पोलिसांनी सांगावे. अन्यथा ‘सनातनद्वेषापायीच पोलीस अशी कृती करत होते’, असे हिंदूंना वाटल्यास चूक ते काय ?

‘प्रयागराज (कुंभनगरी) येथे पौष पौर्णिमेच्या निमित्ताने कुंभमेळ्यात २१.१.२०१९ या दिवशी त्रिवेणी संगमावर दुसरे स्नानपर्व उत्साही वातावरणात पार पडले. या वेळी त्रिवेणी संगमावर ‘सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने भाविकांचे हार्दिक स्वागत’ असे फलक साधकांनी हातात धरले होते. यांतील काही फलक साधकांनी पहाटे ४ वाजल्यापासूनच हातात धरले होते. सकाळी ८.३० नंतर पोलिसांनी हे फलक काढण्यास साधकांना भाग पाडले. पोलिसांनी फलक लावण्यास मनाई केली.’

पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते दैनिक सनातन प्रभातच्या जवळच्या कार्यालयाला कळवा.


Multi Language |Offline reading | PDF