परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त होणार्‍या धार्मिक विधींसाठी ‘तातडीने रुईच्या ताज्या समिधा हव्या आहेत’, असे समजल्यावर सकारात्मक राहून देवाचे साहाय्य घेतल्यावर देवाच्या नियोजनाची आलेली प्रचीती !

१. पुरोहितांनी ‘तातडीने रुईच्या ताज्या समिधा हव्या आहेत’, असे सांगितल्यावर साधकांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूनही संपर्क न होणे आणि त्यानंतर देवाला विचारले नसल्याची जाणीव होणे

‘९.५.२०१९ या दिवशी संध्याकाळी मला पुरोहितांनी सांगितले, ‘‘तातडीने रुईच्या ताज्या समिधा हव्या आहेत.’’ त्या वेळी मी १ – २ साधकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना संपर्क होत नव्हता. त्या वेळी ‘मी बुद्धीने सेवा करत आहे. मी देवाला विचारले नाही’, याची मला जाणीव झाली.

श्री. श्रीराम खेडेकर

२. देवाने साधक श्री. श्रीराम खेडेकर यांना विचारण्यास सांगणे, आश्रमाच्या पहिल्या माळाच्या आगाशीत येऊन श्री. श्रीराम खेडेकर यांना भ्रमणभाष करतांना ते आश्रमाच्या बाहेर दुचाकी लावतांना दिसणे, तेव्हा ‘देवानेच त्यांना या सेवेसाठी पाठवले’, असे वाटणे

अंधार पडू लागल्याने अर्ध्या घंट्याच्या आत समिधा काढायच्या होत्या. त्या वेळी मी आश्रमाच्या पहिल्या माळ्यावर होते. मी देवाची क्षमा मागून त्याला विचारले, ‘देवा, या सेवेसाठी तू कोणाची निवड केली आहेस ?’ तेव्हा देवाने मला सांगितले, ‘फोंडा येथील साधक श्री. श्रीराम खेडेकर यांच्यात पुष्कळ भाव आहे. त्यांना विचारू शकतेस.’ तेव्हा क्षणभर मला वाटले, ‘‘रुईच्या समिधा आश्रमापासून केवळ ५ मिनिटांच्या अंतरावर उपलब्ध होतील’, हे मला आणि श्री. श्रीराम खेडेकर यांना ठाऊक आहे; पण ते प्रसारसेवेत व्यस्त असतील. अर्ध्या घंट्यात समिधा काढून होतील का ? देवाने सांगितले आहे, तर त्यांना भ्रमणभाष करून पाहूया.’ त्यानंतर मी आश्रमाच्या पहिल्या माळ्याच्या आगाशीत येऊन श्री. श्रीराम खेडेकर यांना भ्रमणभाष करत होते. तेव्हा मला ते आश्रमाच्या बाहेर दुचाकी लावत असतांना दिसले. देवानेच जणू काही त्यांना या सेवेसाठी पाठवले होते.

३. श्री. श्रीराम खेडेकर यांना सेवेविषयी विचारल्यावर त्यांनी आनंदाने होकार देणे, ते आणि आश्रमातील एक साधक अशा दोघांनी मिळून ती सेवा अर्ध्या घंट्यात पूर्ण केल्यावर देवाचे नियोजन लक्षात येणे

मी श्री. श्रीराम खेडेकर यांना सेवेविषयी विचारल्यावर त्यांनी लगेच होकार दिला. त्यांना ही सेवा मिळाल्यामुळे फार आनंद झाला. ते आणि आश्रमातील एक साधक या दोघांनी मिळून अर्ध्या घंट्यात ती सेवा पूर्ण केली. तेव्हा ‘आपल्याला जी सेवा सांगितली जाते, तिचे पूर्ण नियोजन देवाने केलेले असते. आपण सकारात्मक राहिलो, तर सगळे सकारात्मक होते’, याची देवाने मला पुन्हा अनुभूती दिली.

४. रुईमध्ये मारुतितत्त्व असणे आणि ‘मारुतीने श्री. श्रीराम खेडेकर यांना या सेवेसाठी आश्रमात आणले’, असे वाटणेे

श्रीरामदादांनी समिधा काढल्यावर त्यांचा तोंडवळ्यावरील आनंद पहातांना मला वाटले, ‘रुईमध्ये मारुतितत्त्व असते आणि खेडेकरांचे नाव श्रीराम आहे. प्रत्यक्ष मारुतीरायाच श्रीरामदादांना या सेवेसाठी आश्रमात घेऊन आला. त्यानेच त्यांची निवड केली.’

– कु. संगीता नाईक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.५.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF