(म्हणे) ‘फलज्योतिष हे एक थोतांड !’ – अंनिस

हिंदु धर्मातील फलज्योतिष हे शास्त्र आहे; परंतु सोयीनुसार एखाद्या शास्त्राला आव्हान देऊन ते थोतांड असल्याची बोंब ठोकणे हाच मुळात अंनिसचा थोतांडपणा नव्हे काय ?

मुंबई – निवडणूक निकालाचे अचूक भविष्य सांगण्याचा दावा करणार्‍या एकाही ज्योतिषाने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिसचे) आव्हान स्वीकारले नाही. त्यामुळे फलज्योतिष हे एक थोतांड असून त्यांच्या भूलथापांना लोकांनी बळी पडू नये, असे आवाहन अंनिसने केले आहे.

फलज्योतिष हे शास्त्र नसून तो भोळ्याभाबडया लोकांना फसवण्याचा धंदा आहे, अशी भूमिका अंनिसने कायम घेतली आहे. फलज्योतिषांचे थोतांड उघडे पाडण्यासाठी गेल्या वर्षापासून विविध निवडणुकांचे निकाल अचूकपणे सांगण्याचे आव्हान ज्योतिषांना करण्यात येत आहे. अद्यापपर्यंत एकाही ज्योतिषाने अंनिसचे हे आव्हान स्वीकारलेले नाही, अशी माहिती समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली. (आतापर्यंत किती ज्योतिषांनी अंनिसची विविध आवाहन स्वीकारली; मात्र अंनिसने त्यात पळपुटेपणा केला, हे अंनिस का सांगत नाही ? – संपादक)

ते म्हणाले, ‘‘अंनिसच्या वतीने लोकसभा निवडणुकीचे अचूक निकाल सांगा आणि २१ लाख रुपये जिंका’, असे आव्हान ज्योतिषांना दिले होते. अंनिसने त्यासाठी एक प्रश्‍नपत्रिका सिद्ध केली होती. या प्रक्रियेत सहभागी होणार्‍या ज्योतिषांनी एक सहस्र रुपये भरून नोंदणी करायची होती. प्रतीक्षा करून अंनिसच्या वतीने २५ ज्योतिषांना रजिस्टर्ड (नोंदणी) टपालाने त्यांच्या निवासी पत्त्यांवर या प्रश्‍नपत्रिका आणि प्रवेशिका पाठवल्या होत्या; पण कोणीही आमचे आव्हान स्वीकारले नाही.’’


Multi Language |Offline reading | PDF