मुंबईत महापालिका मार्गावर झाडांना पाणी देतांना पाण्याचा अपव्यय

राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असतांना पाण्याचा अपव्यय होऊ देणार्‍या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई केली, तरच अशा प्रकारांना आळा बसेल !

मुंबई – राज्यात दुष्काळ असतांना मुंबईत मात्र झाडांना पाणी देतांना पाणी वाया घालवले जात आहे. साधारण ५० मीटर लांबीच्या महापालिका मार्गावर दुतर्फा ३०-४० मोठी झाडे असून त्यांना प्रतिदिन टँकरने पाणी दिले जाते. झाडांना पाणी देण्याची ही पद्धत इतकी चुकीची आहे की, रस्त्याच्या बाजूला एखादे वाहन असल्यास ते काही क्षणांतच धुतले जाईल आणि झाडे मात्र कोरडीच रहातील. झाडांच्या भोवती पाणी अडवण्यासाठी आडोसा नसल्याने पाणी लगेचच वाहून जाते. टँकरच्या पाण्याचा जोरदार मारा होत असल्याने झाडांच्या मुळांजवळची माती निघून मुळे वर आली आहेत. एकीकडे राज्यात दुष्काळी परिस्थिती असतांना शहरी भागात झाडांना पाणी देण्याच्या नावाखाली पाण्याचा अपव्यय होतांना दिसत आहे.


Multi Language |Offline reading | PDF