नागपूर येथे ‘युवा धर्मप्रेमी संघटन शिबिर’ पार पडले

१. पू. अशोक पात्रीकर आणि शिबिरार्थी

नागपूर – येथे नुकतेच १ दिवसीय ‘युवा धर्मप्रेमी संघटन शिबिर’ घेण्यात आले. या शिबिरात सनातनचे पू. अशोक पात्रीकर यांनी ‘साधनेचे जीवनात महत्त्व’, ‘स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन प्रक्रिया कशी राबवावी ?’ यांविषयी मार्गदर्शन केले. तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. अतुल अर्वेन्ला यांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता’, ‘दैनंदिन जीवनात वेळेचे नियोजन कसे करावे ?’ ‘सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे धर्मप्रसार कसा करावा ?’ यांविषयी सांगितले. ‘लव्ह जिहाद’ या षड्यंत्राविषयी सौ. वैशाली परांजपे यांनी शिबिरार्थींचे प्रबोधन केले. शिबिरात स्वरक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व सांगून त्याविषयीची ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली.

शिबिरार्थींचे कौशल्य जाणून घेण्यासाठी त्यांना विषय देण्यात आले होते. त्यापैकी काहींनी उत्स्फूर्तपणे आणि अभ्यासपूर्वक विषय मांडण्याचा प्रयत्न केला. शिबिरात झालेल्या गटचर्चेत सर्वांनी व्यष्टी साधना आणि समष्टी सेवा यांसाठी वेळ देणार असल्याचे सांगितले. ‘धर्मप्रसार करण्यासाठी सामाजिक प्रसारमाध्यमांचा उपयोग कसा करायचा’ हे शिकून कृती करणार असल्याचे शिबिरार्थींनी उत्स्फूर्तपणे सांगितले. यासह स्वरक्षण प्रशिक्षणवर्गात सहभागी होण्यासाठीही शिबिरार्थींनी अनुकूलता दर्शवली.


Multi Language |Offline reading | PDF