कतरास (झारखंड) येथे भाजपच्या उमेदवाराची विजयी मिरवणूक मशिदीसमोर आल्यावर हिंसाचार

मिरवणुकीच्या वेळी मशिदीच्या ठिकाणीच हिंसाचार का होतो ?, याचा विचार तथाकथित पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी कधी करणार ?

धनबाद (झारखंड) – येथील कतरासच्या रामपूजन नगरमध्ये २३ मेच्या रात्री गिरिडीह लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार चंद्रप्रकाश चौधरी यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक वाजत गाजत मशिदीसमोरून जातांना तणाव निर्माण झाला. त्या वेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवून मिरवणूक पुढे जाऊ दिली; मात्र येथे हिंसाचार झाला. (झारखंडमध्ये भाजपचे राज्य असतांनाही तेथे धर्मांधांवर वचक का निर्माण झाला नाही ? – संपादक) त्यामुळे येथे कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

दुसर्‍या दिवशी म्हणजे २४ मे या दिवशी कतरास बाजार चौकामध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला. पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. या वेळी २ जण घायाळ झाले.


Multi Language |Offline reading | PDF