मागच्या तुलनेत विजयी झालेल्या मुसलमान उमेदवारांच्या संख्येत वाढ

नवी देहली – वर्ष २०१४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत २३ मुसलमान उमेदवार निवडून आले होते. आताच्या निवडणुकीत ही संख्या वाढून २७ झाली आहे.

१. उत्तरप्रदेशात महागठबंधनामुळे ६ मुसलमान उमेदवार विजयी झाले. मागील निवडणुकीत एकही मुसलमान उमेदवार निवडून आला नव्हता.

२. आसाममधून २ मुसलमान उमेदवार जिंकले आहेत. यात बदरूद्दीन अजमल हे पुन्हा निवडून आले आहेत, तर अब्दुल खालिक हे दुसरे उमेदवार विजयी झाले आहेत.

३. केरळमधून २ आणि बंगालमधून ४ मुसलमान उमेदवार विजयी झाले. भाग्यनगर येथून असदुद्दीन ओवैसी पुन्हा जिंकले. तसेच संभाजीनगर येथून एमआयएमचे इम्तियाज जलील विजयी झाले आहेत. लक्षद्वीप येथून महंमद फैजल जिंकले आहेत. जम्मू-काश्मीरमधून ३, तर बिहार आणि तमिळनाडू येथून प्रत्येकी १ जण निवडून आला आहे.

४. वर्ष २००४ मध्ये ३४, वर्ष २००९ मध्ये ३० मुसलमान उमेदवार जिंकले होते. वर्ष १९८० मध्ये ४९ मुसलमान उमेदवार जिंकले होते.


Multi Language |Offline reading | PDF