संभाजीनगर येथील हिंदूंना आता वाली कोण ? – हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड

संभाजीनगर येथील निवडणुकीच्या निकालानंतर दिलेली प्रतिक्रिया

संभाजीनगर येथे वर्ष १९९९ पासून सलग चार लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेचे उमेदवार श्री. चंद्रकांत खैरे हे निवडून येत आहेत. यंदा मात्र त्यांचा पराभव होऊन एम्आयएम्चे इम्तियाज जलील लोकसभा निवडणुकीत निवडून आले. त्याविषयी हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड यांनी पुढील प्रतिक्रिया दिली.

‘लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले, याचा आनंद आहे; पण या आनंदाला एक वेदनादायी झालर आहे. संभाजीनगर येथे शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांची हार होऊन एम्आयएम्चे इम्तियाज जलील निवडून आले. विजयानंतर काढलेल्या मिरवणुकीतही एम्आयएम्च्या कार्यकर्त्यांनी गुंडगिरी केली. हिंदुत्वाचे आणि भगव्याचे रक्षक असणारे चंद्रकांत खैरे यांची हिंदूंच्या फितुरीमुळे हार झाली. आता संभाजीनगरमध्ये हिंदुत्वावरील आघात वाढण्याची शक्यता आहे. तेथील हिंदूंना आता वाली कोण ? भविष्यात अशी चूक हिंदूंनी पुन्हा करू नये, एवढीच अपेक्षा करू शकतो.’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now