उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली आणि ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची बेळगाव येथील चि. पद्माक्षी प्रसाद हळदणकर (वय १ वर्ष) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. पद्माक्षी हळदणकर एक आहे!

वैशाख कृष्ण पक्ष प्रतिपदा, नारद जयंती (१९.५.२०१८) या दिवशी चि. पद्माक्षी हळदणकर हिचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या आई-वडिलांच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

चि. पद्माक्षी हळदणकर

१. जन्मापूर्वी

अ. ‘मला गर्भधारणा होण्यापूर्वी आम्ही दैवी बालकांच्या जीवनावरील काही ध्वनीचित्रचकत्या पाहिल्या होत्या. त्यानुसार आम्ही सात्त्विक बाळ होण्यासाठी प्रयत्न केले.

आ. ‘मला गर्भधारणा झाली आहे कि नाही ?’, याची निश्‍चिती करण्यासाठी मी रुग्णालयात गेले होते. ती ३ – ४ माळ्यांची इमारत होती. तेव्हा माझ्याकडून आपोआप गर्भाभोवती दत्ताच्या नामजपाचे मंडल घातले गेले.

इ. गर्भारपणात मला आवडीच्या सेवा करायला मिळाल्या. मी सेवेला आरंभ करण्यापूर्वी गर्भाला सांगून प्रार्थना करायची. तेव्हा ‘गर्भ मला सेवेसाठी साहाय्य करत आहे’, असे मला जाणवायचे. मला गर्भाशी बोलतांना आनंद व्हायचा.

ई. मला ३ र्‍या मासात (महिन्यात) बेंगळूरू येथे जावे लागले. एवढा प्रवास करूनही मला आणि गर्भाला कसलाही त्रास झाला नाही. ‘गर्भच मला प्रार्थना आणि नामजप करायची आठवण करून द्यायचा’, असे मला जाणवत असे.

२. प्रसूती – प्रसूतीच्या वेळी पांढरा प्रकाश दिसणे

माझी नैसर्गिक प्रसूती झाली. प्रसूतीच्या वेळी मला समोर पांढरा प्रकाश दिसला आणि त्या क्षणी बाळाचा जन्म झाला.

३. जन्मानंतर

३ अ. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी बाळाचे नाव ‘पद्माक्षी’ असे ठेवण्यास सांगणे : ‘आम्हाला मुलगा झाल्यास ‘हरि’ आणि मुलगी झाल्यास ‘राधा’ असे नाव ठेवायचे’, असे यजमानांनी मला सांगितले; परंतु ‘सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी बाळाचे नाव ठेवावे’, अशी माझी तीव्र इच्छा होती. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘पद्माक्षी’ हे नाव सांगितल्यावर सगळ्यांना ते नाव आवडले.’

– सौ. प्रचीती प्रसाद हळदणकर (आई), बेळगाव

३ आ. श्रीकृष्णाच्या चित्राशी बोलणे : ती ‘बाप्पा’ म्हणते. तिला देवतांची चित्रे फार आवडतात. ती श्रीकृष्णाच्या चित्राशी बोलते.

३ इ. परेच्छेने वागणे : ती शक्यतो कुणाकडे जात नाही; पण तिला कुणी बळजोरीने घेतल्यास ती ‘परेच्छा’ असे समजून शांत बसते.

३ ई. एकदा हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या दिवशी मी तिला घेऊन मैदानात बसले होते. तेव्हा मला तिच्या डोळ्यांत इंद्रधनुष्याचे सात रंग दिसत होते.

३ उ. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता : आम्ही रामनाथी आश्रमात गेल्यावर ती एका संतांच्या खोलीत जाण्यासाठी रडत होती. तेव्हा पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ म्हणाले, ‘‘तिला स्पंदने कळतात.’’

४. स्वभावदोष

हट्टीपणा आणि राग येणे.’

– सौ. प्रचीती आणि श्री. प्रसाद शंकर हळदणकर (चि. पद्माक्षीचे आई-वडील), बेळगाव (१५.५.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF