५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला खारघर (नवी मुंबई) येथील चि. शिवांश सूरज सूर्यवंशी (वय १ वर्ष ७ मास) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. शिवांश सूर्यवंशी हा एक आहे!

चि. शिवांश सूर्यवंशी

१. जन्मापूर्वी

अ. ‘गर्भारपणात ९ मास मला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही.

आ. माझा स्वभाव पुष्कळ चिडचिडा होता; पण बाळ पोटात असतांना मी पुष्कळ शांत होते.

इ. ‘प्रतिदिन नामजप करणे, ग्रंथवाचन करणे, भजने ऐकणे’, हे सर्व मी करत होते.

ई. मी प्रतिदिन पोटातील बाळाशी बोलायचे आणि त्याला सतत सांगायचे, ‘आम्ही तुझे या जन्मातले आई-बाबा आहोत; पण ईश्‍वर तुझे जन्मोजन्मीचे माता-पिता आहेत.’

उ. चौथा मास चालू असतांना गुरुमाऊलीचा जन्मोत्सव सोहळा होता. मी संगणकीय प्रणालीद्वारे सोहळा पहात असतांना ‘गर्भातील बाळसुद्धा तो चैतन्यदायी सोहळा अनुभवत आहे’, असे मला सतत जाणवत होते. त्या वेळी बाळाने पहिल्यांदा हालचाल केली होती.

ऊ. शिवांशचे बाबा श्री. सूरज सूर्यवंशी इतर संप्रदायानुसार साधना करतात. ते बाळाला प्रतिदिन ध्यानाचे महत्त्व सांगत असतांना बाळ हालचाल करून प्रतिसाद देत असे.

२. जन्मापासून आतापर्यंत जाणवलेली सूत्रे

२ अ. सहनशील : शिवांशला जन्मतःच कावीळ होती. तो ३ दिवसांचा असतांना त्याच्या रक्ताची तपासणी करायला सांगितली होती. त्या वेळी त्याने कोणत्याही प्रकारचा त्रास दिला नाही.

२ आ. देवाची ओढ

१. शिवांशचे नेहमी देवघराकडे लक्ष असते. तो ३ मासांचा असल्यापासून सायंकाळच्या वेळी आम्ही ‘शुभं करोति’ म्हणायला लागल्यावर प्रतिसाद देत असे.

२. घरात गणपतीची एक छोटी मूर्ती आहे. त्याला त्या मूर्तीशी खेळायला आवडते.

३. बाहेर गेल्यावर मंदिर दिसले किंवा भजन ऐकू आले, तर तो लगेच हात जोडतो किंवा टाळ्या वाजवायला लागतो.

४. त्याला हरिपाठ पुष्कळ आवडतो.

२ इ. शांत : शिवांश ५ मासांचा असतांना त्याची पितृदोष शांती होती. त्या वेळी तो दीड घंटा मांडीवर शांत बसून मंत्र ऐकत होता.

२ ई. शिवांश जेवायच्या वेळी नेहमी दुसर्‍यांना आधी जेवण वाढण्यास सांगतो.

२ उ. तो कापराचे उपाय करतो.

३. स्वभावदोष

हट्टीपणा

– सौ. अश्‍विनी सूर्यवंशी (आई), खारघर, नवी मुंबई.

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.


Multi Language |Offline reading | PDF