२३.५.२०१९ या दिवशी भारतातील लोकसभा निवडणुकांचे निकाल घोषित होण्याच्या संदर्भात मयन महर्षींनी दिलेला संदेश !

‘२३.५.२०१९ या दिवशी भारतात झालेल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल घोषित होणार आहेत.

१. २३.५.२०१९ या दिवसाचे ज्योतिषशास्त्रानुसार महत्त्व

अ. २३.५.२०१९ या दिवशी मकर रास आणि उत्तराषाढा नक्षत्र आहे. कलियुगातील या चरणामध्ये धर्मसंस्थापनेसाठी अवतार घेतलेले श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा जन्म मकर राशीत आणि उत्तराषाढा नक्षत्रात झाला आहे.

आ. २३.५.२०१९ या दिवशी गुरुवार आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी असलेल्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा हा जन्मवार आहे.

इ. २३.५.२०१९ हा दिवस एका दृष्टीनेे पृथ्वीवर श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे राज्य येण्याचा शंखनाद करण्यासारखा दिवस आहे.

ई. ‘कमळ’ हे चिन्ह असलेल्या राजकीय पक्षाचा (‘भारतीय जनता पक्षाचे चिन्ह कमळ आहे.’ – संकलक) नेता (श्री. नरेंद्र मोदी) भारताच्या सिंहासनावर आरूढ होणार आहे.’

– मयन महर्षि (पू. (डॉ.) ॐ उलगनाथनजी यांच्या माध्यमातून) (२२.५.२०१९, संध्याकाळी ७.२३ वाजता)

(मयन महर्षींनी हा संदेश निवडणुकीच्या निकालाच्या १ दिवस आधीच दिला होता. त्यात सांगितल्याप्रमाणे भाजपचे नेते श्री. नरेंद्र मोदी हेच पुन्हा सिंहासनावर आरूढ होणार आहेत. यावरून ‘महर्षि त्रिकालज्ञानी कसे असतात’, हे लक्षात येते. – संकलक)  

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now