माझ्या विजयामुळे अधर्माचा नाश होईल ! – साध्वी प्रज्ञासिंह

  • असे विधान किती विजयी उमेदवार करतात ?
  • हिंदूंना आतंकवादी ठरवणारे दिग्विजय सिंह यांचा साध्वी यांनी केलेला पराभव, म्हणजेच हिंदुद्वेष्ट्यांना चपराक !
साध्वी प्रज्ञासिंह

भोपाळ – मी जिंकणार, हे निश्‍चित आहे. माझा विजय हा धर्माचा विजय असेल. माझ्या विजयामुळे अधर्माचा नाश होईल. भोपाळच्या जनतेने माझ्यावर जो विश्‍वास दाखवला त्यासाठी मी त्यांची आभारी आहे, अशी प्रतिक्रिया येथील भाजपच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केली. त्यांना निवडणुकीत मिळालेल्या आघाडीनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. या वेळी त्यांनी भोपाळच्या मतदारांचे आभार मानले.

राहुल गांधी अमेठीत पराभूत !

अमेठी (उत्तरप्रदेश) येथे उभे असणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी पराभव केला, तर वायनाड (केरळ) येथे राहुल गांधी आघाडीवर आहेत.


Multi Language |Offline reading | PDF