आंध्रप्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुकीत तेलुगू देसमचा दारूण पराभव

तेलुगू देसम् आणि वायएस्आर् काँग्रेस

अमरावती (आंध्रप्रदेश) – आंध्रप्रदेश राज्य विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी तेलुगू देसम् पक्षाच्या सरकारचा दारूण पराभव झाला असून त्याला केवळ २५ जागांवर आघाडी मिळाली आहे, तर प्रमुख विरोधी पक्ष असणार्‍या जगनमोहन रेड्डी यांच्या वायएस्आर् काँग्रेस पक्षाला १४९ जागांवर आघाडी मिळाली आहे. याशिवाय जनसेना पक्षाला केवळ एकाच जागेवर आघाडी मिळवता आली आहे. राज्यात बहुमतासाठी १७५ पैकी ८८ जागांची आवश्यकता असते. या पराभवामुळे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू त्यागपत्र देणार आहेत. जगनमोहन रेड्डी ३० मे या दिवशी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

ओडिशामध्ये पाचव्यांदा नवीन पटनायक यांचे सरकार येणार

भुवनेश्‍वर – ओडिशामध्ये सत्ताधारी बिजू जनता दलाचे पाचव्यांदा सरकार येणार आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार आहेत. बिजू जनता दलाला १०७ जागांवर आघाडी मिळाली आहे. येथे बहुमतासाठी ७४ जागांची आवश्यकता असते.

अरुणाचल प्रदेशामध्ये भाजप आघाडीवर

अरुणाचल प्रदेशामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला आघाडी मिळाली आहे, तसेच सिक्किम येथील विधानसभा निवडणुकीमध्ये एस्डीएफ् आघाडीवर आहे.


Multi Language |Offline reading | PDF