महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना युतीला ४१ जागांवर आघाडी

मुंबई – महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांपैकी भाजप २३, तर शिवसेना १८ जागांवर आघाडीवर आहे. शिवसेनेचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री अनंत गिते यांचा रायगड मतदार संघात पराभव झाला असून तेथे सिंचन घोटाळ्याचा आरोप असणारे सुनील तटकरे हे विजयी झाले आहेत. काँग्रेसला १, तर राष्ट्रवादी काँग्रेस ५ ठिकाणी आघाडीवर होती. काँग्रेसचे नांदेड येथील उमेदवार आणि सनातन संस्थेवर सातत्याने बंदीची मागणी करणारे अशोक चव्हाण यांचा पराभव झाला आहे.


Multi Language |Offline reading | PDF