महर्षींच्या आज्ञेनुसार कृष्णराज्यासाठी पूरक राज्यकर्ते भारतवर्षाला मिळण्यासाठी गायत्रीमंत्राचा जपयज्ञ !

महर्षींच्या आज्ञेनुसार कृष्णराज्यासाठी (हिंदु राष्ट्रासाठी) पूरक राज्यकर्ते भारतवर्षाला मिळण्यासाठी सनातनचे आश्रम आणि सेवाकेंद्रे मिळून ११ ठिकाणी गायत्रीमंत्राचा जपयज्ञ !

गायत्रीमंत्राच्या जपयज्ञाचा संकल्प करतांना पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ, बाजूला पुरोहित श्री. अमर जोशी

सनातन आश्रम (रामनाथी), २३ मे (वार्ता.) – पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून मार्गदर्शन करणारे मयन महर्षि यांच्या आज्ञेने सनातनचे आश्रम आणि सेवाकेंद्रे अशा ११ ठिकाणी २३ मे या दिवशी सकाळी ८.३० ते सायं. ६.३० या कालावधीत गायत्रीमंत्राचा जप करण्यात आला. ‘कृष्णराज्यासाठी (हिंदु राष्ट्रासाठी) पूरक राज्यकर्ते भारतवर्षाला मिळावेत आणि त्यांच्याकडून ईश्‍वराला अपेक्षित असे योगदान लाभावे’, या उद्देशाने हा जप करण्यात आला. रामनाथी (गोवा) येथील आश्रमात सनातनचे संत पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते या जपाचा संकल्प करण्यात आला.

क्षणचित्र

जेव्हा सायंकाळी ६.३० वाजता गायत्रीमंत्राचा जप संपला, तेव्हा देहलीमध्ये त्याच वेळेस विजा चमकल्या आणि ढगांचा गडगडाट होऊन पाऊस पडला. हा पाऊस म्हणजे वरुणदेवाने दिलेला हा आशीर्वादच होता. कर्म पूर्णत्वाला गेल्याचे हे प्रतीक होय. – श्री. विनायक शानभाग, देहली. (२३.५.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF