महिलेला अश्‍लील ध्वनीचित्रफीत पाठवणार्‍या धर्मांधाला मुंबई पोलिसांनी जम्मू-काश्मीर येथे जाऊन केली अटक !

पोलिसांनी अशी कर्तव्यदक्षता दाखवल्यास गुन्हेगारांवर वचक बसेल आणि जनतेच्या मनात पोलिसांविषयी विश्‍वासार्हता निर्माण होईल !

मुंबई – वडाळा येथील एका महिलेला अश्‍लील ध्वनीचित्रफीत पाठवणार्‍या मेहफूज मोहम्मद राशिद खान या धर्मांधाला मुंबई पोलिसांनी जम्मू-काश्मीर येथे जाऊन अटक केली. या वेळी मेहफूज याच्या २०-२५ नातेवाइकांनी पोलिसांना केलेल्या विरोधाला न जुमानता पोलिसांनी त्याला कह्यात घेतले. (गुन्हेगाराला पाठीशी घालणारे धर्मांध नातेवाईक ! – संपादक) खान याला न्यायालयात उपस्थित केले असता त्याला ३० सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन संमत करण्यात आला.

१. २ जानेवारी या दिवशी या महिलेला एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअ‍ॅपवर अश्‍लील संदेश आणि अश्‍लील ध्वनीचित्रफीती आल्या. महिलेच्या पतीने त्या क्रमांकावर संपर्क करून याविषयी विचारणा केली असता धर्मांधाने ‘मला ध्वनीचित्रफिती पाठवायच्या होत्या; म्हणून मी पाठवल्या. तुम्हाला जे करायचे ते करा’, असे उद्धटपणे उत्तर दिले. (उद्दाम आणि वासनांध धर्मांध ! – संपादक)

२. यानंतर ५ जानेवारी या दिवशी महिलेच्या पतीने वडाळा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. यावर पोलिसांनी भा.दं.वि. ३५४(अ)१ आणि माहिती तंत्रज्ञान कायदा ६७(अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला.

३. धर्मांधाने ‘सीमकार्ड’ पालटल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांना अडचणीचे ठरत होते. १७ मे या दिवशी जम्मू-काश्मीर येथील पुंछ सेक्टरमधील बाफ्लियाज गावात पोलिसांना या भ्रमणभाष क्रमांकाचा ‘ट्रेस’ लागला.

४. त्यानंतर साहाय्यक पोलीस निरीक्षक चारू भारती आणि २ पोलीस हवालदार यांचे पथक जम्मू-काश्मीर येथे पोचले. १८ मे या दिवशी स्थानिक पोलिसांच्या साहाय्याने धर्मांधाच्या घराबाहेर दबा धरून १९ मे या दिवशी सकाळी धर्मांधाला कह्यात घेण्यात आले. हा परिसर अतिशय संवेदनशील असूनही पोलिसांनी ही कारवाई केली.


Multi Language |Offline reading | PDF