‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला उपस्थित रहाण्याचा नंदुरबार येथील हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

बैठकीला उपस्थित धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते

नंदुरबार, २२ मे (वार्ता.) – श्री रामनाथ देवस्थान, फोंडा (गोवा) येथे २७ मे ते ८ जून या कालावधीत होणार्‍या ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला बांगलादेशसह २६ राज्यांतील २०० हून अधिक संघटनांचे ८०० पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. अधिवेशनात नंदुरबार येथील ४ हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते आणि ९ धर्मप्रेमी या सहभागी होणार आहेत. अधिवेशनाला येणार्‍या हिंदुत्वनिष्ठांची २० मे या दिवशी बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अधिवक्ता अनिल लोढा, जिल्हा बार असोसिएशनचे माजी सचिव अधिवक्ता देवेंद्र मराठे, सदस्य अधिवक्ता प्रियदर्शन महाजन, अधिवक्ता सुशील गवळी यांसह स्वदेशी विकास मंचचे श्री. कपिल चौधरी, धर्मप्रेमी सर्वश्री मयूर चौधरी, गौरव धामणे, गणेश राजपूत, जितेंद्र मराठे, सतिष बागुल, हिरालाल पाटील, मयूर खैरनार, राजू चौधरी आदी उपस्थित होते.


Multi Language |Offline reading | PDF