परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त करण्यात येणार्‍या धार्मिक विधींच्या वेळी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी नेसावयाच्या साड्या खरेदी करतांना ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मानसी राजंदेकर यांना आलेल्या अनुभूती !

‘परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवानिमित्त महर्षींनी यज्ञयागादी काही धार्मिक विधी रामनाथी आश्रमात करायला सांगितले होते. हे विधी करतांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होण्यासाठी ‘सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी कोणत्या रंगाच्या साड्या नेसाव्यात ?’, याविषयीही महर्षींनी सांगितले होते. मी पुणे येथे या साड्या खरेदी करण्याची सेवा करत होते.

सौ. मानसी राजंदेकर

१. ‘जोगेश्‍वरी सिल्क’ या दुकानात जाऊन साड्या खरेदी केल्यावर तेथे असलेली केशरी रंगाची साडी पाहून ‘उद्या केशरी रंगाची साडी घ्यावी लागेल’, असा विचार मनात येणे आणि घरी गेल्यावर रात्री त्या संदर्भातील निरोप समजणे

३.५.२०१९ या दिवशी पुणे येथील ‘जोगेश्‍वरी सिल्क’ या दुकानात मी साड्या खरेदी करण्यासाठी गेले. या दुकानाचे मालक ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. चंद्रकांत पासकंठी हे नेहमी ‘सनातन प्रभात नियतकालिकां’त विज्ञापन देऊन धर्मकार्यात सहभागी होतात. यज्ञयागादी विधी करतांना सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी नेसावयाच्या विशिष्ट रंगाच्या साड्या मी घेतल्या. त्या वेळी तेथे मी एक केशरी रंगाची साडी पाहिली. तेव्हा माझ्या मनात ‘उद्या केशरी रंगाची साडी घ्यावी लागेल’, असा विचार आला. मी घरी गेल्यावर रात्री २ केशरी रंगाच्या साडी खरेदी करण्याचा निरोप मला समजला.

२. दुकानातील कर्मचारी स्वामीदादांना साधिका केशरी रंगाची साडी खरेदी करायला येण्यासंदर्भात मिळालेली पूर्वसूचना!

२ अ. साधिका दुकानात गेल्यावर स्वामीदादांनी तिला ‘काल रात्रीच आलेल्या नवीन साठ्यातील केशरी रंगाच्या पैठणी काढून ठेवल्या आहेत’, असे सांगणे : दुसर्‍या दिवशी सकाळी १०.४५ वाजता मी दुकानात केशरी रंगाच्या साड्या खरेदी करण्यासाठी गेले. मी दुकानात जाताच तेथील एक कर्मचारी स्वामीदादा यांनी मला सांगितले, ‘‘ताई, तुमच्यासाठी काल रात्रीच आलेल्या नवीन साठ्यातील केशरी रंगाच्या पैठणी काढून ठेवल्या आहेत.’’ त्यांनी साड्यांचा गठ्ठा माझ्यासमोर उघडला आणि ते मला म्हणाले, ‘‘तुम्हीच या साड्या सर्वात प्रथम बघणार आहात.’’

२ आ. स्वामीदादांनी साधिकेला ‘काल रात्री दुकान बंद करतांना उद्या सौ. मानसीताई केशरी रंगाच्या साड्या घ्यायला येणार आहेत’, असा विचार मनात आल्याविषयी सांगणे : नंतर त्यांनी मला सांगितले, ‘‘काल रात्री दुकान बंद करतांना माझ्या मनात अकस्मात विचार आला, ‘आता आलेल्या नवीन केशरी रंगाच्या पैठणी साड्या काढून ठेवूया. उद्या सौ. मानसीताई येणार आहेत. त्यांना या केशरी रंगाच्या साड्या लागतील.’’ (प्रत्यक्षात त्यांना याविषयी ठाऊक नव्हते.)

३. स्वामीदादा सात्त्विक वृत्तीचे असणे आणि त्यांच्या मनात संत अन् आश्रम यांच्या प्रती आदरभाव असणे

त्यांचे बोलणे ऐकून माझे मन कृतज्ञतेने भरून आले. स्वामीदादा मला नेहमी साड्या दाखवतात. त्यांचे नाव ऐकल्यावर मला वाटले, ‘देवाच्या सेवेसाठी देवच साहाय्य करायला आला आहे.’ स्वामीदादा सात्त्विक वृत्तीचे असल्याचे जाणवते. त्यांच्या मनात संत आणि आश्रम यांच्या प्रती आदरभाव असल्याचे जाणवते.’

– सौ. मानसी राजंदेकर, पुणे (१४.५.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF