दादर येथे विवाहानिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने धर्मप्रसार

ग्रंथ पहातांना जिज्ञासू

मुंबई – दादर येथील सरस्वती विद्यालयात ८ मे या दिवशी सनातनचे साधक श्री. मोनिष चित्रे यांचा विवाह सोहळा झाला. या वेळी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने धर्मप्रसार करण्यात आला. या वेळी सनातनच्या ग्रंथांचे प्रदर्शन, तसेच क्रांतीकारकांविषयी माहिती देणार्‍या फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. यासह संत भक्तराज महाराज यांच्याविषयीची, तसेच धर्मशिक्षण देणारी ध्वनीचित्रफित उपस्थितांना दाखवण्यात आली. ५० जिज्ञासूंनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.

विशेष : ‘सनातन संस्थेचे उपक्रम चांगले असतात. या उपक्रमांमध्ये राजकीय हस्तक्षेप नसल्याने ते आम्हाला आवडतात’, अशी प्रतिक्रिया एका जिज्ञासूने व्यक्त केली.


Multi Language |Offline reading | PDF