ऑस्ट्रियामध्ये प्राथमिक शाळांमध्ये ‘हिजाब’ (डोके झाकण्याचे वस्त्र) घालण्यावर बंदी

युरोपमधील लहान लहान पुरोगामी आणि विकसित देश बुरखा आणि हिजाब यांच्यावर बंदी घालतात; मात्र भारतात असे केेले जात नाही !

 

व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) – युुरोपमधील ऑस्ट्रिया देशातील प्राथमिक शाळांमध्ये ‘हिजाब’वर (डोके झाकण्याचे वस्त्र) बंदी घालण्यात आली आहे. या संदर्भातील कायदा करण्यात आला आहे. हा कायदा करतांना तेथे कुठेही इस्लामचा उल्लेख करण्यात आलेला नाही. मुसलमानांच्या विरोधापासून बचाव होण्यासाठी असे करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या कायद्यानुसार ‘डोके झाकण्यासाठी कोणतेही वस्त्र जे कोणत्याही धर्माच्या संबंधित असेल, तरी त्यावर बंदी असणार आहे’, असे म्हटले आहे. या कायद्यात थेट ‘हिजाब’ हा शब्द न वापरता ‘हेडस्कार्फ’ असा शब्द वापरण्यात आला आहे; मात्र त्याच वेळेस शीख मुलांच्या डोक्यावरील ‘पटका’ आणि ज्यू मुलांच्या डोक्यावरील ‘किप्पा’ यांना या कायद्यातून वगळण्यात आले आहे.  (भारतातही असे करता येऊ शकते ! – संपादक)

मुसलमान संघटनांनी मात्र या कायद्याचा विरोध केला आहे. ‘हा कायदा धर्मियांमध्ये फाळणी करणारा आहे’, असे म्हटले आहे.


Multi Language |Offline reading | PDF