राजीव गांधी यांच्या हत्येतील दोषींच्या मुक्ततेसाठी तमिळनाडू सरकार वचनबद्ध ! – मुख्यमंत्री पलानीस्वामी

एकीकडे राजीव गांधी यांच्या मारेकर्‍यांना सोडण्यासाठी तमिळनाडू सरकार वचन देते, तर दुसरीकडे पंडित नथुराम गोडसे यांची जयंती साजरी केली म्हणून हिंदु महासभेच्या कार्यकर्त्यांना अटक होते, ही लोकशाही आहे का ?

सालेम (तमिळनाडू) – माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याकांडातील सातही दोषींच्या मुक्ततेसाठी आमचे सरकार वचनबद्ध आहे, असे तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी म्हटले आहे.

१. पलानीस्वामी म्हणाले की, विधानसभेच्या शिफारसींनुसार या दोषींना सोडून देण्यासाठी राज्यपाल निर्णय घेतील. व्यक्तिशः आम्हालाही त्या सातही जणांना मुक्त करावे असे वाटते. त्यासाठीच आम्ही विधानसभेत प्रस्ताव मांडला असून तो राज्यपालांकडे पाठवला आहे.

२. विरोधी पक्षांनी या ७ जणांच्या मुक्ततेसाठी पुन्हा याचिका प्रविष्ट केली आहे. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर त्यांच्या समवेत मारल्या गेलेल्यांचे कुटुंबीय या याचिकेच्या विरोधात आहेत. त्यांनी या ७ जणांच्या मुक्ततेला विरोध केला आहे.

 


Multi Language |Offline reading | PDF