(म्हणे) ‘भारत आणि चीन एकाच कुटुंबातील दोन भावांप्रमाणे असल्याने मतभेद स्वाभाविक !’ – चीनचे भारतातील राजदूत

या वक्तव्यावरून ‘पुन्हा ‘हिंदी चिनी भाई भाई’ सांगत चीन भारतावर कुरघोडी करणार’, असेच लक्षात येते !

नवी देहली – भारत आणि चीन एकाच कुटुंबातील २ भावांप्रमाणे आहेत.  त्यांच्यात लहान-मोठ्या कारणांवरून होणारे वाद हे स्वाभाविक आहेत; मात्र हे वाद कायम राहू शकत नाहीत, असे प्रतिपादन भारतातील चीनचे राजदूत लुओ झाओहुई यांनी डोकलाम प्रकरणी भारत आणि चीन यांच्यातील संबंधांवर बोलतांना केले. वर्ष २०१७ मध्ये डोकलाम प्रकरणाच्या वेळी लुओ यांनी या वादावर तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

लुओ म्हणाले की, २ मोठ्या देशांमध्ये चर्चा होते, तेव्हा हे आवश्यक नाही की, त्यांच्यामध्ये सहमती होईलच. डोकलाम प्रकरण हा भूतकाळ आहे. आता दोन्ही देशांचे संबंध स्थिर आहेत. आमच्या दोघांमधील संबंधांना ७० वर्षे पूर्ण होत आहेत.


Multi Language |Offline reading | PDF