आतंकवादाचा प्रसार केल्याच्या प्रकरणी सौदी अरबमध्ये ३ मुसलमान धर्मगुरूंना फाशीची शिक्षा !

  • भारतात गेली ३ दशके जिहादी आतंकवादी कारवाया होत असतांना अशा प्रकारे आतंकवादाचा प्रसार करणार्‍यांना भारताने कधी फाशी दिली आहे का ?
  • काश्मीरमध्ये आतंकवाद्यांशी लढणार्‍या सैनिकांवर दगडफेक करणार्‍यांवरही कारवाई न करणारा भारत सौदी अरबसारखी कृती कधीतरी करू शकेल का ?
  • इस्लामी राष्ट्र असणार्‍या सौदी अरबमध्ये मुसलमान धर्मगुरूंना आतंकवादाचा प्रचार केल्याच्या प्रकरणात फाशी दिली जाते; मात्र भारतात प्रत्यक्षात संसदेवर आणि अन्यत्र आक्रमण करणार्‍या आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा होऊनही अनेक वर्षे पोसले जाते आणि वर त्यांना वाचवण्यासाठी मध्यरात्रीही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी केली जाते !

रियाध (सौदी अरब) – रमझान संपल्यानंतर सौदी अरबच्या सरकारकडून शेख सलमान अल अवदाह, आवाद अल कारनी आणि अली अल कुमारी या ३ मुसलमान धर्मगुरूंना देशात आतंकवादाचा प्रसार आणि प्रचार केल्याच्या प्रकरणी फासावर लटकवण्यात येणार आहे. यांतील शेख सलमान अल अवदाह हे आंतरराष्ट्रीय ख्याती असलेले धर्मगुरु आहेत. अल कारनी हे मौलवी आणि लेखक आहेत, तर अल कुमारी हे प्रसिद्ध धर्मप्रसारक आहेत.

गेल्या मासामध्ये सौदी अरबमध्ये ३७ जणांना फासावर लटकवण्यात आले होतेे. या सर्वांवर आतंकवाद पसरवल्याचे आरोप आहेत. सौदी अरबमध्ये वर्ष २०१८ मध्ये १४८ जणांना फासावर लटकवण्यात आले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now