परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितलेल्या उपायांमुळे संधीवातामुळे होणारे त्रास पुष्कळ प्रमाणात न्यून होणे

परात्पर गुरु पांडे महाराज

१. संधीवाताच्या व्याधीचा आरंभ

‘मला १९९५ पासून म्हणजे मागील २० वर्षांपासून संधीवाताचा पुष्कळ त्रास होत होता; परंतु त्याही परिस्थितीत मला घरातील सर्व कामे करणे जमत होते. त्या वेळी मला पोटभर जेवण मात्र जात नसे. मला खाण्या-पिण्याची विशेष आवड नव्हती आणि दिवसही व्यस्ततेत जात होते. त्यानंतर वर्ष १९९८ पासून मला अशक्तपणा जाणवून त्यात पुष्कळ प्रमाणात वाढ होऊ लागली.

२. संधीवातामुळे झालेले विविध त्रास

अ. संधीवात झाल्यानंतर साधारण २ वर्षांनी मला पोटदुखी आणि सातत्याने सर्दी अन् खोकला होत होता. त्यामुळे माझे खाणेही पुष्कळच उणावले होते.

आ. मी सलग ५ वर्षे आयुर्वेदिक औषधोपचार चालू केले होते; परंतु त्या ५ वर्षांमध्ये माझ्या डाव्या पायाला येणारी सूज न्यून होत नसे. काही दिवसांनंतर मला डावा पाय जवळही घेता येत नव्हता. त्यामुळे माझे खाली बसणेही संपुष्टात आले.

इ. वर्ष २०१५ मध्ये उजव्या गुडघ्याला सूज येऊन त्यात पाणी झाले. आधुनिक वैद्यांनी इंजेक्शन देऊन गुडघ्यातील पाणी काढले; परंतु तेव्हापासून माझा उजवा पाय पुष्कळ अधू झाला. त्यानंतर जोराने आणि थोडे अधिक चालले की, पायाला सूज येऊन तो दुखत असे. थोडे जरी वजन उचलले, तरीही उजव्या पायाला सूज येऊन पाय दुखत असे.

ई. एकदा मी घरात भ्रमणभाषवर संभाषण करत होते. ते संभाषण जवळजवळ १ घंटा चालू होते. त्या वेळी मला अचानक चक्कर आली. त्यामुळे माझी शुद्धच हरपली. त्यानंतर मला तशा प्रकारची चक्कर कधीही आली नाही; परंतु त्यानंतर माझे त्रास आणखीनच वाढत गेले. तेव्हापासून मी अ‍ॅलोपथीचे औषधोपचार चालू केले.

२. आश्रमात पूर्णवेळ साधना करण्याची संधी मिळणे

मी गेल्या १७ वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहे. आरंभीची ३ वर्षे मी महाड येथे प्रसाराची सेवा केली. त्यानंतर अलीबाग येथे आल्यावर काही कारणास्तव केवळ व्यष्टी साधना करत होते. तेव्हा माझी शारीरिक स्थितीही ठीक नव्हती. मी नीट चालूही शकत नव्हते. मार्च २०१७ पासून मला देवद आश्रमात पूर्णवेळ साधना करण्याची संधी मिळाली. मी देवद आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहे. मी जपमाळा ओवण्याची सेवा करत आहे.

३. आश्रमात संतांच्या अस्तित्वाचा आध्यात्मिक लाभ होणे

आश्रमातील चैतन्यामुळे मी सेवा करू शकत आहे आणि माझा नामजपही चांगला होऊ लागला आहे. येथील संतांचा सहवास, तसेच त्यांचे दर्शन यांचा मला आध्यात्मिक स्तरावर लाभ होत आहे.

४. परात्पर गुरु पांडे महाराजांनी उपाय सांगण्यापूर्वीची साधिकेची स्थिती

संधीवातामुळे हळूहळू माझे हात-पाय वाकडे झाले होते. माझी कमरही वाकडी झालेली होती. कमरेमध्ये पुष्कळ बाक आला होता. मला चालतांना पुष्कळ हळूहळू चालावे लागत असे. माझ्या हाता-पायांमध्ये होणार्‍या वेदनांचे प्रमाणही वाढले होते. मी अधिक वेळ एका जागी बसले, तर माझी कंबर दुखत असे.

५. परात्पर गुरु पांडे महाराजांनी सांगितलेल्या उपायांमुळे झालेले पालट

अ. २५.७.२०१७ या दिवशी परात्पर गुरु पांडे महाराज यांची दृष्टी माझ्यावर पडली. त्यांनी त्याच वेळी माझ्यासाठी नामजपादी उपाय आरंभ केले. तेव्हापासून माझी आखडलेली मान पूर्णपणे सुटली आणि माझी पाठही हलकी झाल्याचे मला जाणवते.

आ. परात्पर गुरु महाराज माझ्यासाठी अधूनमधून उपाय सांगत. त्यांनी २७.७.२०१७ या दिवशी केलेल्या उपायांनंतर मला पुष्कळ हलकेपणा जाणवला.

इ. २.८.२०१७ या दिवशी परात्पर गुरु महाराजांनी सांगितलेल्या उपायांमुळे माझा डावा पाय कुठेही न दुखता थोडासा जवळ येऊ लागला आहे. तेव्हापासून आता कितीही वेळ बसले, तरी माझी पाठ दुखत नाही.

ई. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी माझ्यासाठी उपाय सांगितलेच, त्याव्यतिरिक्त त्यांनी शारीरिक त्रास दूर करण्यासाठी मंत्रोपायही दिले आहेत. मंत्रोपाय करायला लागल्यापासून मला माझ्यात पुष्कळ पालट जाणवत आहे.

परात्पर गुरु महाराज, तुमच्या दिव्य मंत्रोपायानी मला पूर्वीसारखे चालता येईल, याची मला पूर्ण खात्री आहे. कृतज्ञ !

– आपली चरणसेविका,

श्रीमती अनघा प्रकाश कुंटे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (७.८.२०१७)

(प्रश्‍न : प.पू. बाबा, अजूनही माझा उजवा गुडघा आणि कंबर दुखते. सकाळी उठल्यावर गुडघा आणि पाय आखडलेल्या स्थितीतच जाणवतात. ते थोड्या वेळाने सुटतात.

परात्पर गुरु पांडे महाराज : यासाठी मंत्र देत आहे. सैंधव मिठाचे खडे कापडात घेऊन पायांच्या वाकड्या झालेल्या बोटांना बांधून ठेवावेत.)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक


Multi Language |Offline reading | PDF