सांताक्रूझ येथे ‘शौर्य जागरण’ उपक्रमाच्या माध्यमातून स्वरक्षण प्रशिक्षणाविषयी जागृती !

सांताक्रूझ (पू) – शौर्य जागरणाअभावी आज हिंदु समाज सर्वत्र पराभूत होत असून त्याच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत आम्ही अजिंक्य शूरवीर नृसिंह आहोत, याचे प्रदर्शन घडवण्याची वेळ आली आहे. वीर असलेलेच पृथ्वीवर राज्य करतात. त्यामुळे स्वत:मध्ये वीरता येण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे, असे प्रेरणादायी मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या सौ. जान्हवी भदिर्के यांनी केले. ‘धोबीघाट वाकोला ब्रिज’ येथील ‘जय हनुमान सेवा मंडळ’ या ठिकाणी १० मे या दिवशी शौर्य जागरण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी स्वरक्षणाची प्रात्यक्षिके दाखवली. धर्मप्रेमी कु. उज्ज्वला थोपकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात पुढाकार घेतला. मंडळाचे अध्यक्ष श्री. नीलेश कदम यांच्यासह ३० धर्मप्रेमी या वेळी उपस्थित होते.

वाकोला पाईप लाईन येथील परकर चाळ, दत्त मंदिर मार्ग येथे ११ मे या दिवशी शौर्य जागरण उपक्रम घेण्यात आला. हिंदु जनजागृती समितीचे श्री. संदीप गवंडी यांनी उपस्थित १२ धर्मप्रेमींना मार्गदर्शन केले. सनातन प्रभातचे वाचक श्री. सतीश परकर यांची मुलगी कु. निलाक्षी हिने विभागातील युवकांना एकत्र आणून या उपक्रमाचे आयोजन केले.


Multi Language |Offline reading | PDF