रेकी करून श्री वज्रेश्‍वरी मंदिरात दरोडा टाकणार्‍या ५ जणांना अटक, ३ पसार

  • आधी आतंकवाद्यांकडून आणि आता दरोडेखोरांकडूनही मंदिरांची रेकी केली जाणे, हे गंभीर आहे. हिंदूंनो, मंदिरांच्या रक्षणार्थ आतातरी एकत्र या !
  • पुन्हा मंदिरांच्या निधीवर डोळा ठेवण्याचे कोणाचे धाडस होऊ नये, यासाठी या दरोडेखोरांना सरकारने कठोरात कठोर शिक्षा देणे आवश्यक आहे ! 

ठाणे – येथील भिवंडी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री वज्रेश्‍वरी योगिनीदेवीच्या मंदिरात सशस्त्र दरोडा टाकणार्‍या दरोडेखोरांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. या दरोडेखोरांनी चोरी करण्याअगोदर मंदिराची ‘रेकी’ केली होती. गोविंद गिंभल, विनीत चिमडा, भारत वाघ, जगदीश नावतरे, प्रवीण नावतरे अशी त्यांची नावे आहेत. (मंदिरातून हडप केलेले धन या सर्वांकडून वसूल करून घ्यायला हवे ! – संपादक) दरोडेखोरांना शहापूर परिसर, तसेच दादरा-नगर हवेली येथून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २ लाख ८३ सहस्र रुपये जप्त केले आहेत. अद्याप तीन दरोडेखोर पसार आहेत.


Multi Language |Offline reading | PDF