(म्हणे) ‘मतमोजणीपर्यंत इस्लामच्या रक्षणासाठी सामूहिक प्रार्थना करा !’

पुन्हा भाजपचे सरकार येणार असल्यामुळे ‘दारुल उलूम देवबंद’च्या मौलानाकडून मुसलमानांना आवाहन

  • २३ मेच्या दिवशी नाही, तर प्रत्येक दिवशी हिंदूंनी हिंदु (ईश्‍वरी) राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रार्थना केली पाहिजे !
  • ‘हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीचे सरकार सत्तेत आल्यावर मुसलमानांना पोटशूळ उठतो. त्यामुळे ‘त्यांचे कितीही लांगूलचालन केले, तरी ते विरोधच करणार’, हे भाजपच्या लक्षात येईल, तो सुदिन !

सहारनपूर (उत्तरप्रदेश) – इस्लामी शिक्षणसंस्था ‘दारुल उलूम देवबंद’चे वरिष्ठ मौलाना मुफ्ती महमूद हसन बुलंदशहरी यांनी सर्व मुसलमानांना मतमोजणीपर्यंत ३ दिवस नमाजानंतर सामूहिक प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. ‘इस्लाम, मुसलमान, मशीद आणि मदरसे यांच्या रक्षणासाठी अश्रू ढाळून सामूहिक प्रार्थना करा. कोणाच्या प्रार्थना स्वीकारल्या जातील, हे आम्ही सांगू शकत नाही; पण देशाची चांगल्या दिशेने वाटचाल चालू होईल’, असे त्यांनी म्हटले आहे. याचे उलेमांकडूनही समर्थन केले जात आहे. मतदानोत्तर चाचणीच्या अंदाजामध्ये भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळत असल्याचे समोर आल्यावर असंतुष्ट झाल्याने मौलाना यांनी हे आवाहन केले आहे.

१. मौलाना पुढे म्हणाले की, निवडणुकीचे निकाल घोषित होईपर्यंत मी सर्व मशिदींना नियमितच्या नमाजपठणानंतर विशेष प्रार्थना करण्याचे आवाहन करतो. ३ दिवस आधी ही प्रार्थना चालू झाली पाहिजे. देशाला चांगले सरकार मिळावे, देशाच्या नागरिकांचे रक्षण व्हावे, यासाठी असे आवाहन केले आहे.

२. मौलाना इशाक गोरा म्हणाले की, आम्ही या आवाहनाचे स्वागत करतो. सर्व मुसलमानांनी धार्मिकतेने याचे पालन करावे. निवडणूक निकालाची आम्हाला चिंता आहे. सर्वांना समवेत घेऊन जाणार्‍या सरकारची आपल्या देशाला आवश्यकता आहे. त्यामुळे मुफ्तींचे आवाहन गांभीर्याने घ्यावे. (देशविरोधी कारवाया करण्यात कोण पुढे असतात, हे जनता जाणून आहे. असे असतांनाही ‘त्यांच्यावर कारवाई होऊ नये’, ‘त्यांच्याशी सामंजस्याने वागावे’, असे वाटणे ही धर्मांधताच होय ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now