‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त ठरवलेले उपक्रम राबवल्यामुळे हिंदु राष्ट्र येणारच ! – सुरेश यादव, श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान

अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाची माहिती देण्यासाठी बेळगाव, जळगाव आणि कोल्हापूर येथे पत्रकार परिषद !

कोल्हापूर, २१ मे (वार्ता.) – गोवा येथे होत असलेल्या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त विविध हिंदु संघटनांचे प्रतिनिधी सहभागी असतात. या अधिवेशनाच्या माध्यमातून विचारमंथन होते. भविष्यात कोणते कार्यक्रम राबवायचे, ते अधिवेशनात ठरवले जाते. गेल्या ७ वर्षांपासून हे अधिवेशन चालू आहे. मीही या अधिवेशनासाठी उपस्थित रहाणार असून या अधिवेशनात ठरवलेले उपक्रम राबवल्यामुळे हिंदु राष्ट्र येणार यात शंका नाही, असे मनोगत श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. सुरेश यादव यांनी व्यक्त केले. ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ची माहिती देण्यासाठी २१ मे या दिवशी कोल्हापूर येथील प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेला ते संबोधित करत होते.

पत्रकार परिषदेत डावीकडून आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे, सौ. राजश्री तिवारी, श्री. किरण दुसे, श्री. राजू यादव आणि बोलतांना श्री. सुरेश यादव

या पत्रकार परिषदेस हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे आणि सौ. राजश्री तिवारी, सनातन संस्थेचे आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे आणि शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव उपस्थित होते. शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव म्हणाले, ‘‘यापूर्वी २ अधिवेशनांना मी उपस्थित होतो. देशातील प्रमुख हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे मान्यवर यात सहभागी असतात. ‘हिंदुत्वाचे कार्य करतांना येणार्‍या अडचणींविषयी तक्रार कशी करावी ?’ यासंदर्भात, तसेच अन्य कायदेशीर मार्गदर्शन या अधिवेशनातून मिळते.’’

श्री. किरण दुसे यांनी अधिवेशनाचा उद्देश स्पष्ट करून या अधिवेशनात कोल्हापूर येथून ३३ हिंदुत्वनिष्ठ सहभागी होणार असल्याचे सांगितले.

क्षणचित्र – एका महिला पत्रकाराने ‘धर्मशिक्षणाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यास आवडेल’, असे सांगितले.

डावीकडून श्री. पंकज घाडी, श्री. गुरुप्रसाद गौडा आणि सौ. उज्ज्वला गावडे

बेळगाव, २१ मे (वार्ता.) – हिंदु समाजाला त्याच्या शक्तीची जाणीव करून देऊन संघटितपणे हिंदु राष्ट्र साकार करण्यासाठी कृतीची पुढील दिशा ठरवणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गोव्यात यावर्षीही २७ मे ते ८ जून या कालावधीत श्री रामनाथ देवस्थान, फोंडा, गोवा येथे ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा यांनी २१ मे या दिवशी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. अधिवेशनाची माहिती देण्यासाठी २१ मे या दिवशी कन्नड साहित्य भवन, बेळगाव येथे आयोजित परिषदेला ते संबोधित करत होते. पत्रकार परिषदेला माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. पंकज घाडी आणि सनातन संस्थेच्या सौ. उज्ज्वला गावडे उपस्थित होते.

श्री. गुरुप्रसाद गौडा म्हणाले, ‘‘गेल्या ७ वर्षांतील अखिल भारतीय हिंदू अधिवेशनांमुळे देशभरात ‘हिंदु राष्ट्र’ या संकल्पनेविषयी पुष्कळ जागृती झाली आहे. या अधिवेशनाला भारतातील २६ राज्यांसह बांगलादेशसहित २०० हून अधिक हिंदु संघटनांचे ८०० पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत.’’ या वेळी श्री. गुरुप्रसाद गौडा आणि सौ. उज्ज्वला गावडे यांनी अधिवेशनाचे वेळापत्रक उपस्थितांना सांगितले.

श्री. गुरुप्रसाद गौडा यांनी शेवटी सांगितले, ‘‘मागील ७ राष्ट्रीय अधिवेशनांत निश्‍चित झाल्यानुसार कर्नाटक राज्यातील ७ जिल्ह्यांत जिल्हास्तरीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले. याच कार्याला अधिक गती देण्याचा प्रयत्न आठव्या अधिवेशनाद्वारे होईल. या अधिवेशनात बेळगाव येथून अधिवक्ते, उद्योगपती तसेच हिंदुत्वनिष्ठ असे एकूण ३० हून अधिक जण सहभागी होतील.’’

डावीकडून श्री. दीपक तिवारी, परिषदेला संबोधतांना सद्गुरु नंदकुमार जाधव, कु. रागेश्री देशपांडे, श्री. मोहन तिवारी

जळगाव, २१ मे (वार्ता.) – येथेही अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाची माहिती हिंदु जनजागृती समितीच्या धुळे-नंदुरबार जिल्हा समन्वयक कु. रागेश्री देशपांडे यांनी २१ मे या दिवशीच्या पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस शिवसेना ग्राहक संरक्षण मंच जळगाव महानगरप्रमुख श्री. मोहन तिवारी आणि सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव, हिंदुत्वनिष्ठ व्यावसायिक श्री. दीपक तिवारी उपस्थित होते.

कु. रागेश्री देशपांडे शेवटी म्हणाल्या, ‘‘मागील ७ राष्ट्रीय अधिवेशनांत निश्‍चित झाल्यानुसार जळगाव जिल्ह्यातही राष्ट्ररक्षण, धर्मरक्षण यांच्या दृष्टीने आंदोलने करण्यात आली, तसेच प्रशासनास निवेदने देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फौजिया खान यांनी मनुस्मृतीचे दहन करून अवमान केला होता. त्या विरोधात आंदोलन करून श्रीमती खान यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे करण्यात आली होती. यांसह अन्य राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होणार्‍या आघातांच्या विरोधातही जळगाव, धुळे, नंदुरबार येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलने घेण्यात आली आणि प्रशासनास निवेदने देण्यात आली. धुळे येथे दोन दिवसीय प्रांतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले. याच कार्याला अधिक गती देण्याचा प्रयत्न या आठव्या अधिवेशनाद्वारे होईल.’’

या अधिवेशनात जळगाव येथील १२, धुळे येथील १६ आणि नंदुरबार येथील ६ अधिवक्ते, व्यावसायिक, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.


Multi Language |Offline reading | PDF