बांगलादेशामध्ये हिंदु मुलीचे धर्मांधांकडून अपहरण

भाजपने गेल्या ५ वर्षांत भारतातील हिंदु तरुणींच्या रक्षणासाठी काहीच केले नाही, तसेच मुसलमानबहुल देशांतील हिंदूंच्या रक्षणासाठीही काहीच कृती केली नाही !

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशामधील हटकर मौझा येथील मोतीलाल रबीदास यांच्या १५ वर्षीय मुलीचे २२ एप्रिल या दिवशी रात्री ९.३० वाजता ४ धर्मांधांनी घरातून अपहरण केले; मात्र अद्याप पोलिसांना तिचा शोध लावता आलेला नाही.

१० वीमध्ये शिकत असलेल्या या मुलीच्या शेजारी रहात असलेला १७ वर्षीय लीजू मिया हा तिला नेहमी त्रास देत असे. मुलीने त्याची तक्रार वडिलांकडे केली असता त्यांनी लीजू मिया याच्या वडिलांना याविषयी सांगितले; मात्र त्यावर त्यांनी काहीच केले नाही. उलट मनात राग ठेवला. मुलीचे वडील मोतीलाल रबीदास आणि आई रुग्णालयात गेले होते. घरी केवळ पीडित मुलगी आणि तिची ३ वर्षीय लहान बहीण होती. लीजू मिया त्याच्या ३ साथीदारांसह पीडित मुलीच्या घरी आला आणि त्याने या दोघींचे हातपाय बांधले. त्यांनी ३ वर्षीय मुलीला घरीच ठेवून मोठ्या बहिणीला रिक्शातून पळवून नेले. या घटनेची तक्रार मोतीलाल रबीदास यांनी २६ एप्रिल या दिवशी सोनाटाळा बागुरा पोलीस ठाण्यात नोंदवली. मात्र अद्याप पोलिसांना मुलीचा शोध लावता आलेला नाही.


Multi Language |Offline reading | PDF