हिंदु राष्ट्र साकार करण्यासाठी कृतीची पुढील दिशा ठरवणार ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

  • २७ मेपासून गोव्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन !

  • देहली, मुंबई, पुणे, बेंगळूरू आणि हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथेही पत्रकार परिषदेचे आयोजन

पणजी (गोवा) – राज्यघटनेत सर्व नागरिकांना समान अधिकार देण्याविषयी स्पष्ट भूमिका असतांनाही देशात ‘समान नागरी कायदा’ लागू केला जात नाही. मशिदी आणि चर्च यांच्यासाठी स्वतंत्र कायदे करणारे ‘सेक्युलर’ सरकार हिंदूंच्या मंदिरांवर नियंत्रण मिळवून सरकारच्या मर्जीप्रमाणे हिंदूंच्या देवनिधीचा वापर करत आहे, तसेच शबरीमलासारख्या ठिकाणी हिंदूंच्या प्राचीन परंपराही नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे सर्व एकीकडे घडत असतांना दुसरीकडे ख्रिस्तीबहुल मिझोराम राज्यात राज्य सरकारने ख्रिस्ती पद्धतीने पदग्रहण सोहळा केला, तसेच ‘आमचे ख्रिस्ती राज्य असल्याने आम्हाला हिंदु राज्यपाल नको’, अशी विचित्र मागणी केली. या पार्श्‍वभूमीवर हिंदु राष्ट्राचा संकल्प हिंदु संघटनांनी केला आहे. हिंदु राष्ट्र साकार करण्यासाठी कृतीची पुढील दिशा ठरवणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गोव्यात यावर्षीही २७ मे ते ८ जून या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते पणजी येथे आयोजित परिषदेला संबोधित करत होते. या पत्रकार परिषदेस हिंदु विधीज्ञ परिषदेचे श्री. नागेश जोशी (ताकभाते), रणरागिणी शाखेच्या गोवा राज्य समन्वयक सौ. राजश्री गडेकर आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस हे उपस्थित होते.

डावीकडून अधिवक्ता नागेश जोशी (ताकभाते), श्री. चेतन राजहंस, श्री. रमेश शिंदे आणि सौ. राजश्री गडेकर

२० मे या दिवशी देहली, मुंबई, पुणे, बेंगळूरू आणि हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथेही पत्रकार परिषदांचे आयोजन करण्यात आले होते.

देहली येथील पत्रकार परिषदेत डावीकडून सनातन संस्थेच्या कु. कृतिका खत्री, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि देहली येथील आमदार श्री. कपिल मिश्रा

भारत अनादी काळापासून स्वयंभू सनातन हिंदु राष्ट्र !

श्री. शिंदे पुढे म्हणाले की, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वर्ष १९७६ मध्ये आणीबाणीच्या काळात विरोधी पक्षांच्या नेत्यांना कारागृहात डांबले आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ राज्यघटनेत घटनाविरोधी पद्धतीने पालट केला. त्यात ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) शब्द घुसडण्यात आला. त्यानंतर भारतात ‘सेक्युलर’वादाचा उपयोग केवळ अल्पसंख्यांकांचे लाड पुरवण्यासाठी आणि स्वतःची मतपेटी सुरक्षित करण्यासाठी झाला आहे. भारत अनादी काळापासून स्वयंभू सनातन हिंदु राष्ट्र आहे. भारतात ज्यू, पारशी, इराणी आदी जे पंथ आश्रयाला आले, त्या सर्वांना या देशातील हिंदु राजांनी आश्रय दिला आहे. इतकेच काय, तर या देशात आक्रमक लुटारू म्हणून आलेल्या मुसलमानांच्या पिढ्यांनाही हिंदु समाजाने आपले मानले आहे. त्यांनी धर्माच्या आधारे केलेल्या भारताच्या फाळणीचे दुःख बाजूला सारून त्यांना देशात अल्पसंख्य म्हणून विशेष अधिकार दिले आहेत. हिंदु समाजाने इतका त्याग करूनही हिंदु राष्ट्राची मागणी केल्यावर ‘सेक्युलर’वाद्यांच्या पोटात गोळा येण्याचे कारण काय आहे ? सुदैवाने देशातील राजकीय पक्षांना आता बहुसंख्य हिंदु समाजाचे महत्त्व कळू लागले आहे. ‘सेक्युलर’वादी नेते आता मंदिरांत आणि हिंदूंच्या कार्यक्रमांत दिसू लागले आहेत. तसेच मेघालय उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनीही ‘फाळणीनंतर भारत हिंदु राष्ट्र बनला पाहिजे होता’, असे मत निकालात व्यक्त केले आहे.

धर्मप्रेमी अधिवक्ता अधिवेशन

हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता श्री. नागेश जोशी (ताकभाते) यांनी सांगितले की, देशभरात वाढत असलेल्या सामाजिक दुष्प्रवृत्तींना रोखण्यासाठी आणि भारताला घटनात्मकदृष्ट्या ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याच्या दृष्टीने कृती निश्‍चित करण्यासाठी अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या अंतर्गत धर्मप्रेमी अधिवक्त्यांचे ‘धर्मप्रेमी अधिवक्ता अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे. हे अधिवेशन २७ आणि २८ मे या दिवशी होणार आहे.

उद्योगपती अधिवेशन

रणरागिणी शाखेच्या सौ. राजश्री गडेकर म्हणाल्या, ‘‘समाज, राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्यरत व्यावसायिक, व्यापारी अन् उद्योगपती यांचे कृतीशील संघटन करण्यासाठी, तसेच विविध आपत्तींच्या काळात समाजासाठी साहाय्य करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी प्रथम एक-दिवसीय ‘उद्योगपती अधिवेशन’ २८ मे या दिवशी अधिवेशनाच्या मुख्य स्थळी आयोजित करण्यात आले आहे.’’

‘सोशल मीडिया कॉन्क्लेव्ह’चे (सामाजिक माध्यमांतून धर्मप्रेमींच्या बैठकीचे) आयोजन

सनातन संस्थेचे श्री. चेतन राजहंस यांनी पत्रकारांना संबोधित करतांना म्हटले, ‘‘हिंदु राष्ट्राची संकल्पना १०० कोटी हिंंदु समाजापर्यंत शीघ्रगतीने पोेचण्याच्या दृष्टीने ‘सोशल मीडिया’ हे आजचे सर्वांत प्रभावी माध्यम आहे. त्याचे महत्त्व लक्षात घेता ‘सोशल मीडिया’च्या क्षेत्रातील धर्मनिष्ठ हिंदु कार्यकर्ते आणि विचारवंत यांच्यासाठी प्रथम एक दिवसीय ‘सोशल मीडिया कॉन्क्लेव्ह’चे (सामाजिक माध्यमांतून धर्मप्रेमींच्या बैठकीचे) आयोजनही केले आहे. ही ‘कॉन्क्लेव्ह’ रविवार, २ जून या दिवशी अधिवेशनाच्या मुख्य स्थळी असणार आहे.’’

हिंदु राष्ट्र-संघटक प्रशिक्षण आणि अधिवेशन

श्री. राजहंस पुढे म्हणाले, ‘‘भ्रष्टाचार, शासनाचा गैरकारभार आणि धर्मावर होणारे विविध आघात यांच्या विरोधात लढतांना हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना विविध अडचणी अन् समस्या यांना सामोरे जावे लागते. या दृष्टीने त्यांचे प्रशिक्षण व्हावे आणि या धर्मकार्यात यश मिळण्यासाठी साधनाविषयक मार्गदर्शन मिळावे, यांसाठी ‘हिंदु राष्ट्र-संघटक प्रशिक्षण आणि अधिवेशन’ आयोजित केले आहे.

५ ते ८ जून या कालावधीत होत असलेल्या अधिवेशनात प्रामुख्याने ‘धर्मकार्य करतांना आपले आचरण कसे असावे, सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधात लढा कसा द्यावा, माहिती अधिकार कायद्याचा प्रभावीपणे वापर कसा करावा, कौशल्य विकास’ आदींचे प्रशिक्षण दिले जाईल.’’

अधिवेशनाला मान्यवरांची उपस्थिती

शेवटी श्री. रमेश शिंदे यांनी सांगितले की, ‘‘या अधिवेशनाला बांगलादेश येथील ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष, ‘हिंदु फ्रन्ट फॉर जस्टिस’चे अध्यक्ष आणि राममंदिर आंदोलनाचे ज्येष्ठ अधिवक्ता हरि शंकर जैन, शबरीमला मंदिरासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करणारे अधिवक्ता जे. साईदीपक, ‘वर्ल्ड हिंदु फेडरेशन’चे श्री. अजय सिंह, केंद्रीय गृह मंत्रालयाचे माजी वरिष्ठ अधिकारी तसेच ‘हिंदु आतंकवाद – एक मिथ्या’ या पुस्तकाचे लेखक श्री. आर्.व्ही.एस्. मणी, बंगालचे प्रसिद्ध अधिवक्ता जॉयदीप मुखर्जी, ‘टेम्पल वर्शिपर्स सोसायटी’चे अध्यक्ष श्री. टी.आर्. रमेश, केंद्र सरकारचे माजी सांस्कृतिक सल्लागार, तसेच धर्माचे गाढे अभ्यासक प्रा. रामेश्‍वर मिश्र, ‘हिंदु मक्कल कत्छी’ पक्षाचे संस्थापक अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ, तेलंगण येथील हिंदुत्वनिष्ठ आणि लोकप्रिय आमदार

श्री. टी. राजासिंह, देहलीचे आमदार श्री. कपिल मिश्र आदींसह अनेक मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.’’

अधिवेशनात २०० हून अधिक हिंदु संघटनांचे ८०० पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित रहाणार !

श्री. रमेश शिंदे पुढे म्हणाले, ‘‘गेल्या ७ वर्षांतील अखिल भारतीय हिंदू अधिवेशनांमुळे देशभरात ‘हिंदु राष्ट्र’ या संकल्पनेविषयी मोठी जागृती झाली आहे. या अधिवेशनातील सर्व कार्यक्रमांना मिळून भारतातील २६ राज्ये आणि बांगलादेश येथून एकूण २०० हून अधिक हिंदु संघटनांचे ८०० पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. केंद्रात नवीन सरकारच्या स्थापनेनंतर काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन, समान नागरी कायदा, कलम ३७० रहित करणे, गोवंश हत्याबंदी, धर्मांतर बंदी, अयोध्येत श्रीराम मंदिराचे पुनर्निर्माण आदी हिंदूंच्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांवर विचारमंथन करून सरकारला ठोस भूमिका घेण्यास भाग पाडण्याच्या दृष्टीने संघटनात्मक प्रयत्नांची निश्‍चिती या अधिवेशनाद्वारे केली जाणार आहे. त्यासह पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका येथील हिंदूंचे रक्षण करण्याच्या संदर्भातही चर्चा केली जाणार आहे.’’

अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण

जगभरातील हिंदुत्वनिष्ठांसाठी या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे थेट प्रक्षेपणही करण्यात येणार आहे !

यूट्यूब चॅनल : Hindu Janajagruti Samiti

फेसबूक पान : /HinduAdhiveshan

ट्विटर : @HinduJagrutiOrg

याचा हिंदुत्वनिष्ठांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. रमेश शिंदे यांनी केले.

पूर्व आणि पूर्वोत्तर राज्यांतून ११ हून अधिक संघटना सहभागी होणार

डावीकडून पू. प्रदीप खेमका, श्री. शंभु गवारे आणि अधिवक्ता सुदीप गुप्ता

धनबाद (झारखंड) – १८ मे या दिवशी येथील ओरिएंटल हॉटेलमध्ये हिंदु जनजागृती समितीकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सनातन संस्थेचे धर्मप्रसारक पू. प्रदीप खेमका यांनी २७ मे पासून रामनाथी, गोवा येथे होणार्‍या अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाची माहिती दिली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे पूर्वोत्तर भारत राज्य समन्वयक श्री. शंभु गवारे आणि अधिवक्ता सुदीप गुप्ता हे उपस्थित होते. या अधिवेशनाला पूर्व आणि पूर्वोत्तर राज्यातील भारतीय साधक समाज, हिंदू महासभा, श्रीकृष्ण सेना, महाकाल सेना, हिंदू साहाय्यता समिती, गोरक्षा साहाय्यता समिती, अखिल भारतीय हिंदु युवक संघ, हिंदू जागरण मंच, भारतीय कामगार सेना, ऑल आसाम टी गार्डन असोसिएशन, विवेकानंद मंच आदी

११ हून अधिक संघटना उपस्थित रहाणार आहे. तसेच सुप्रिम कोर्ट बार काऊंसिलचे आणि बंगाल बिल्डिंग अ‍ॅण्ड अदर कन्सट्रक्शन वेलफेयर बोर्डाचे अध्यक्ष अधिवक्ता जॉयदीप मुखर्जी, हिंदू जागरण मंच अन् दक्षिण आसाम प्रांत विधि प्रमुख अधिवक्ता राजीव नाथ हे मान्यवरही यात सहभागी होणार आहेत, अशी माहिती पू. खेमका यांनी दिली.

बेंगळूरू

सनातन संस्थेच्या सौ. गायत्री कृष्णमूर्ती, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मोहन गौडा, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता अमृतेश एन्.पी. आणि उद्योगपती श्री. राजेंद्र पारिख

हुब्बळ्ळी

सनातन संस्थेच्या सौ. विदुला हळदीपूर, अधिवक्ता मलेशप्पा बाडगी आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. गुरुप्रसाद गौडा


Multi Language |Offline reading | PDF