केंद्रीय अर्थमंत्री, संरक्षणमंत्री यांच्यासह अनेक मंत्र्यांनी सरकारी बंगल्यांचे भाडे थकवले !

  • भाडे थकवणारे मंत्री जनतेसमोर आदर्श काय ठेवणार ? अशा मंत्र्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय कारवाई करणार ?
  • भाडे थकवणार्‍यांना प्रशासनाने बंगल्याबाहेर का काढले नाही ? एखाद्या सामान्य व्यक्तीने भाडे थकवले, तर प्रशासन संबंधितांना त्यांच्या सामानासह बाहेर काढते, असे अनुभव जनतेने घेतले असतांना मंत्र्यांना सूट का ?

नवी देहली – केंद्रीय नगरविकास खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री विजय गोयल, प्रकाश जावडेकर, निर्मला सीतारामन्, सुषमा स्वराज यांच्यासह अनेक मंत्र्यांनी फेब्रुवारी मासापर्यंत सरकारी बंगल्यांचे भाडे थकवल्याचे समोर आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अजितकुमार सिंह यांनी केंद्रीय नगरविकास खात्याकडून मागवलेल्या माहितीतून हे उघडकीस आले.

अजितकुमार सिंह यांना मिळालेली माहिती पुढीलप्रमाणे आहे

१. फेब्रुवारी २०१९ पर्यंत संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय गोयल यांच्याकडून अनुमाने ३ लाख रुपये, तर केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंह यांच्याकडून २ लाख ८८ सहस्र २६९ रुपये थकबाकी येणे शिल्लक आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन् यांनी ५३ सहस्र २७६ रुपये, तर प्रकाश जावडेकर यांनी ८६ सहस्र ९२३ रुपये भाडे थकवले आहे.

२. केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नकवी आणि राज्यमंत्री जीतेंद्र सिंह यांनी बंगल्यामध्ये वापरण्यात येत असलेले फर्निचर आणि अन्य वस्तू यांची खरेदी केली; मात्र देयक भरलेले नाही. नकवी यांनी १ लाख ४६ लाख रुपये, तर सिंह यांनी ३ लाख १८ सहस्र रुपये थकवले आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now