कमल हसन यांना अटकपूर्व जामीन संमत

चेन्नई – मक्कल निधी मैय्यम पक्षाचे अध्यक्ष आणि अभिनेते कमल हसन यांना मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठाने अटकपूर्व जामीन संमत केला आहे. हसन यांचे संपूर्ण भाषण विचारात घेऊन, तसेच ते एका नोंदणीकृत राजकीय पक्षाचे नेते असल्याने न्या. पुगालेंधी यांनी त्यांना अटकपूर्व जामीन संमत केला. त्याचसह पुढील १५ दिवसांत हसन यांनी करूर येथील न्यायालयात हजेरी लावण्याचा आदेशही न्यायालयाने दिला. ‘नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदु आतंकवादी होता’, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता.


Multi Language |Offline reading | PDF